शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्टसाठी पोलिस व्हेरिफिकेशन विलंबाने, उमेदवार ठाण्यातच मारतात चकरा

By साहेबराव हिवराळे | Updated: March 19, 2024 19:46 IST

पोलिस व्हेरिफिकेशन तत्काळ झाल्यास ८ ते १० दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात येईल, असा दावा टपाल कार्यालयाने केला

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केल्याने स्थानिक नागरिकांना त्यांचा पासपोर्ट काढण्यासठी मुंबईच्या चकरा मारण्याची कसरत थांबलेली आहे. सध्या प्रतिदिवस ८० जणांच्या मुलाखतीची व्यवस्था असल्याने पोलिस व्हेरिफिकेशन तत्काळ झाल्यास ८ ते १० दिवसांत पासपोर्ट नागरिकांच्या हातात येईल, असा दावा टपाल कार्यालयाने केला आहे. परंतु, काही प्रकरणात दीड महिन्यापर्यंत पोलिस व्हेरिफिकेशनला विलंब होत असल्याने चकरा माराव्या लागतात.

पासपोर्ट कार्यालयात ऑनलाइन अर्ज नोंदणीनुसार पूर्वी दोन महिन्यांची 'वेटिंग' होती; परंतु आता शनिवारीदेखील कामकाज सुरू असल्याने ती आता दीड महिन्यावर आली आहे. अधिकचे टेबल वाढविण्याचा प्रस्ताव होता; परंतु प्रत्यक्षात तशा काही हालचाली घडल्या नव्हत्या, आता कार्यालयातील यंत्रणा वाढविण्यात आलेली असली तरी पोलिस व्हेरिफिकेशनलाच वेळ होतो आहे. लिंक असलेल्या मोबाइलवर पासपोर्ट संदर्भातील संदेश येतात, परंतु जानेवारीत मुलाखत देऊनही अनेकांचे व्हेरिफिकेशन झालेले नाही.

स्मार्ट शहरात अधिक 'स्मार्ट' काम व्हावे, यासाठी गती वाढविण्याची आवश्यकता आहे, असे पासपोर्ट लाभधारकांचे मत आहे. स्मार्ट सिटी छत्रपती संभाजीनगरात उद्योग तसेच शैक्षणिक कारणासाठी देश-विदेशात ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरातून परदेशी जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. शहरातून परदेशी जाणारेही वाढत असल्याने या कार्यालयाकडून तत्काळ पासपोर्ट उपलब्धतेविषयी अचूक काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.

पासपोर्ट कार्यालयात चाचपणीऑनलाइन देण्यात आलेल्या मुलाखती वेळेत केल्या जातात. त्यात कोणताही विलंब नाही, परंतु कागदपत्रातील त्रुटी वगळता इतर उमेदवारांच्या मुलाखती करून घेतल्या जातात. पोलिस यंत्रणेत अडकल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्याचे समजते. इतर जिल्ह्यातील टॅग सिस्टमप्रमाणे काम व्हावे.- प्रवर डाक अधीक्षक जी. हरी प्रसाद.

कायदा व सुव्यवस्थेमुळे थोडाफार विलंब..शहरात कायदा व सुव्यवस्थेला महत्त्व द्यावे लागते. आंदोलने असतात. आता आचारसंहिता आली आहे. पोलिस ठाण्यात आलेल्या पासपोर्ट अचूक व्हेरिफिकेशन तत्काळ निकाली काढले जातात. पेंडिंग ठेवत नाहीत असे पोलिस अधिकारी म्हणाले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट