शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना होऊन गेल्यानंतर महिलेच्या शरीरात पस, औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 06:56 IST

CoronaVirus News : एमआरआय तपासणीतून ही बाब उघड झाली. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न, ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर ही महिला रुग्णालयातून चालत घरी गेली.

औरंगाबाद : जगभरात कोराेनाचा विळखा कमी होण्याची आशा असतानाच ब्रिटनमधील नव्या विषाणूच्या जन्माने नवे संकट उभे राहिले. या सगळ्यात जर्मनीतील ६ रुग्णांनंतर भारतात पहिल्यांदाच औरंगाबादेत कोरोना होऊन गेलेल्या महिलेच्या शरीरात मणक्यासह विविध अवयवांत पस (पू) झाल्याचे आढळले. एमआरआय तपासणीतून ही बाब उघड झाली. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न, ३ शस्त्रक्रिया आणि २१ दिवसांच्या उपचारानंतर ही महिला रुग्णालयातून चालत घरी गेली.मणक्याची शस्त्रक्रिया ३ तास चालली. दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली. शहरातील न्यू बालाजीनगरातील ३९ वर्षीय महिला गेल्या काही दिवसांपासून पाठदुखी, कंबरदुखीने त्रस्त होती. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मणकाविकारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत दहिभाते यांच्याकडे उपचार सुरू असताना ‘एमआरआय’द्वारे तपासणी करण्यात आली. त्यांच्या मणक्यात, पोटात, दोन्ही हातांत आणि शरीरातील अन्य भागांत पस झाल्याचे आढळले. डॉ. दहिभाते यांनी त्यांच्या आजाराच्या कारणांचा शोध घेतला. तेव्हा कोरोनामुळे असा परिमाण होत असल्याचे आणि आतापर्यंत जर्मनीत असे ६ रुग्ण आढळल्याचे समोर आले.

कोरोना होऊन गेला; पण कळलेही नाहीसदर महिलेला कोरोनाचे निदान झालेले नव्हते. शिवाय कुटुंबातही कोणाला कोरोनाची लागण झालेली नव्हती; परंतु ॲन्टी बाॅडी टेस्ट करण्यात आली. त्यातून त्यांना कोरोना होऊन गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर महिलेवर उपचाराचे आव्हान डॉक्टरांपुढे होते. ते आव्हान पेलत डॉ. श्रीकांत दहिभाते, डॉ. रजनीकांत जोशी आणि डॉ. प्रसाद वैद्य यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून महिलेचा जीव वाचविला. 

५०० मि.ली. पस काढलासदर महिलेचा मणका आणि शरीरातील अन्य अवयवांतून तब्बल ५०० मि.ली. पस काढण्यात आला. मणक्याची शस्त्रक्रिया ३ तास चालली. दुसरी आणि तिसरी शस्त्रक्रिया अनुक्रमे दीड आणि एक तास चालली.

पूर्ण शरीरात संक्रमणमहिलेच्या पूर्ण शरीरामध्ये संक्रमण झाले होते. जीवाला धोका होता. तत्काळ शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय उरला होता. एक नाही, तर तब्बल तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. शेवटी २१व्या दिवशी आनंदी चेहऱ्याने रुग्ण चालत घरी गेला. कोरोना झाल्यानंतर मणक्यामध्ये आणि शरीरामध्ये असे संक्रमण होणारा हा जगातील ७वा आणि भारतातील पहिला रुग्ण आहे.             - डॉ. श्रीकांत दहिभाते, मणकाविकारतज्ज्ञ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद