शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाने चक्क स्टेरिंग दिले लहान मुलाच्या हातात; ४२ प्रवाश्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 19:38 IST

मुलाचे रडणे थांबवण्यासाठी काही काळ आपल्यापुढे बसवल्याचा खुलासा चालकाने केला आहे. 

गंगापूर ( औरंगाबाद ) : बसचालकाने गाडीतील प्रवाशी असलेल्या एका लहान मुलाच्या हातात काही वेळासाठी स्टेरिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी ( १२ सप्टेंबर) एसटी महामंडळाच्या गंगापूर आगाराच्या गंगापूर- उदगीर बसमध्ये घडला. दरम्यान, या प्रकरणात बसचालकाला निलंबित करण्यात आले आहे. 

वेळेत, खात्रीशीर व सर्वात सुरक्षित प्रवास अशी एसटीची ओळख आहे. ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य असले तरी महामंडळाच्या गंगापूर आगारातील चालक आर. बी. शेवाळकर यांनी मात्र कमाल केली असून रविवारी गंगापूर - उदगीर ( क्रं एम एच १३ सीयू ८११०) बस फेरी दरम्यान एका लहान मुलाच्या हातात बसची स्टेरिंग दिली. आंबाजोगाईजवळ हा प्रकार चालकाने केला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात चालकाने मुलाला आपल्या समोर बसवून स्टेरिंग हातात ठेवलेली आहे. त्यानंतर काही वेळ चालक केवळ मुलाच्याच हातात स्टेरिंग ठेवतो. या प्रकाराने बसमधील तब्बल ४२ प्रवास्यांचा जीव टांगणीला लागला होता. 

..मुलगा रडत असल्याने गंगापूर आगाराच्या वतीने चालकाचा जवाब नोंदविण्यात आला आहे. यानुसार चालक शेवाळकर यांनी तो मुलगा नातेवाईक नव्हता, त्याचे रडणे थांबवण्यासाठी काही काळ आपल्यापुढे बसवल्याचा खुलासा केला आहे. 

चालक निलंबित धावत्या एसटीचे स्टिअरिंग लहान मुलाच्या हातात देणे चालक शेवाळकर यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकारची गंभीर दखल घेत गंगापूर आगाराचा चालक आर. बी. शेवाळकर यास निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये, असे अरुण सिया म्हणाले.

टॅग्स :state transportएसटीAurangabadऔरंगाबाद