शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, मुंबईसाठी एअर इंडियाच्या विमानाला वाढली प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:34 IST

१२२ वरून १६२, आता १८२ आसनी विमान

ठळक मुद्देजेट एअरवेज बंदचा परिणाम जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधार

औरंगाबाद : जेट एअरवेजचे विमान बंद झाल्यापासून औरंगाबादहून मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा पर्याय उरला आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानाला प्रवाशांची गर्दी वाढत आहे. जेट बंद झाल्यानंतर एअर इंडियाचे १२२ वरून १६२ आसनी विमान येत होते. प्रवाशांची संख्या वाढतच असल्याने आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमानाचे उड्डाण होत आहे.

जेट एअरवेजच्या सकाळच्या विमानामुळे औरंगाबादकरांना मुंबईमार्गे दिल्लीची हवाई सेवा उपलब्ध होती. या कंपनीच्या विमानसेवेने सकाळच्या वेळेत मुंबई आणि दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र, २३ मार्चपासून ही विमानसेवा अचानक ठप्प झाली. जेट एअरवेजची विमानसेवा सुरू असताना पूर्वी एअर इंडियाचे १२२ प्रवासी क्षमतेचे विमान उड्डाण घेत होते; परंतु जेट बंद होताच एअर इंडियाची प्रत्येक दिवसाच्या जागा आरक्षित होणे सुरू झाले. दिवसेंदिवस प्रवाशांची मागणी वाढल्यामुळे एअर इंडियाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठे विमान देण्याची विनंती केली होती. अखेर ५ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या १६२ आसनी विमानाने उड्डाण केले. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्लीसाठी १८२ आसनी विमान उड्डाण घेत आहे. 

जोरदार तिकीट विक्री, पुणे, रेल्वेचा आधारदिल्ली, मुंबईसाठी एकमेव विमानाचा पर्याय राहिला आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कामासाठी मुंबई, दिल्ली जाणाऱ्या प्रवाशांना विमानाचे बुकिंग फूल झाल्याचा अनुभव येत आहे. अशावेळी दिल्लीला विमानाने जाण्यासाठी पुणे गाठावे लागते, तर मुंबईसाठी रेल्वेचा आधार घ्यावा लागतो; परंतु रेल्वेचे आरक्षणही मिळत नसल्यामुळे वाहनाने मुंबईला जाण्याची वेळ शहरवासीयांवर येत आहे. औरंगाबादहून दिल्ली, मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या प्रमुख मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याची संधी नव्या कंपन्यांना असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणाले.

बुकिंग : १८२ आसनी विमानाचे उड्डाणएअर इंडियाच्या विमानाचे बुकिंगदेखील वाढत आहे. यापूर्वी प्रवाशांच्या सुविधेसाठी १६२ आसनी विमान दाखल झाले होते. आता मुंबई-औरंगाबाद-दिल्ली मार्गावर १८२ आसनी विमान उड्डाण घेत असल्याची माहिती एअर इंडियाचे अजय भोळे यांनी दिली. 

टॅग्स :airplaneविमानAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन