शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशनानंतर पालक झाले तयार; पोलिसांनी घरातून पळालेल्या प्रेमी युगूलांची बांधली रेशीमगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:29 IST

पोलीस तपासात समजले की मुलीचे पळशी येथील रमेश ( नाव बदलले आहे ) याच्यावर प्रेम आहे. दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळाले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांच्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांनी विवाहाला मान्यता दिली.

करमाड : पळशी येथील सुशिक्षित व सज्ञान तरुण-तरुणीस विवाहकरून एकत्र राहण्याची इच्छा होती. परंतु, एकाच जातीचे असूनही दोघांच्या घरातून लग्नाला विरोध होऊ शकतो. या कल्पनेतून दोघांनीही घरातून पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघेही मंगळवारी घरातून पळून गेले. या प्रकरण पोलिसात जाताच तपास करत असताना करमाड पोलिसांना खरी माहिती कळाली. यातून पोलिसांनी मध्यस्थ होऊन पालकांचे समुपदेशन करत या जोडप्याचा बुधवारी सायंकाळी विवाह लावून दिला. 

करमाड पोलीस ठाण्यात ​मंगळवारी मुलीची मिसींग दाखल करण्यात आली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी मुलीचा शोध​ सुरु केला. तपासात समजले की मुलीचे पळशी येथील रमेश ( नाव बदलले आहे ) याच्यावर प्रेम आहे. दोघेही लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळाले आहेत. यानंतर माहिती घेऊन पोलिसांनी मुलाच्या भाऊजीला संपर्क केला.  चौकशी केली असता दोघेही सोबत असल्याचे त्यांनी मान्य केले. यानंतर तपास अधिकारी पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी तात्काळ मुलीच्या वडिलांना मुलगी सुखरूप असल्याचे सांगत तिला रमेशसोबत विवाह करायचा असल्याची माहिती दिली. मात्र, मुलीचे आई - वडिल व इतर नातेवाईकांनी विरोध दर्शविला.

पोलिसांच्या समुपदेशनानंतर मुलीच्या पालकांनी विवाहाला मान्यता दिली. बुधवारी संध्याकाळी पळशी येथे मुलाच्या भाऊजीच्या घरी पोलीसांचे मध्यस्थीने अत्यंत साधेपणाने त्यांचा विवाह पार पडला. या शुभकार्यासाठी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांनी विशेष प्रयत्न केले. विवाहानंतर दोन्ही कुटूंबानी पोलीसांचे आभार व्यक्त केले. औरंगाबाद ग्रामीण अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस , पोलीस अंमलदार आनंद काकासाहेब घाटेश्वर यांचे अभिनंदनकरून बक्षीस जाहीर केले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmarriageलग्न