शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याचा मानसिक आजारातून पित्यावरच हल्ला; पित्याची मात्र त्याच्या उपचारासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 16:26 IST

वय अगदी १४ वर्षे...मात्र, खेळण्या-बागडण्याच्या या वयात अचानक एके दिवशी मानसिक आजाराचा विळखा पडतो आणि त्यातून चिमुकला पित्यावरच हल्ला करतो. या हल्ल्याची हा पिता थेट पोलिसांत तक्रार देतो; पण मुलाप्रती असलेली जबाबदारी पिता झटकत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलाचे चुकीचे वागणे पोटात घालून त्याला मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी हा पिता धडपड करीत आहे.

ठळक मुद्देवैजापूर येथील रहिवासी राजेश (नाव बदलले) यांचे दोन मुली, लहान मुलगा आणि पत्नी असे छोटेसे कुटुंब. चा १४ वर्षांचा मुलगा अभिजित (नाव बदलले) याच्या वर्तणुकीत दोन वर्षांपूर्वी अचानक बदल झाला. दोन महिन्यांपूर्वी अभिजितने अचानक राजेश यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताना जिवे मारण्याचीही धमकी दिली.

औरंगाबाद : वय अगदी १४ वर्षे...मात्र, खेळण्या-बागडण्याच्या या वयात अचानक एके दिवशी मानसिक आजाराचा विळखा पडतो आणि त्यातून चिमुकला पित्यावरच हल्ला करतो. या हल्ल्याची हा पिता थेट पोलिसांत तक्रार देतो; पण मुलाप्रती असलेली जबाबदारी पिता झटकत नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मुलाचे चुकीचे वागणे पोटात घालून त्याला मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी हा पिता धडपड करीत आहे.

वैजापूर येथील रहिवासी राजेश (नाव बदलले) यांचे दोन मुली, लहान मुलगा आणि पत्नी असे छोटेसे कुटुंब. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा १४ वर्षांचा मुलगा अभिजित (नाव बदलले) याच्या वर्तणुकीत दोन वर्षांपूर्वी अचानक बदल झाला. तो तेव्हा ७ वी शिकत होता. शाळेत जाण्यासाठी निघाल्यावर तो अर्ध्यातूनच परत येऊ लागला. काही दिवसांनी घरात झोपून राहत होता. प्रत्येकाशी ओरडून बोलू लागला. सुरुवातीला घरात कोणाच्या लक्षात आले नाही; परंतु अभिजितची वागणूक अधिक आक्रमक झाल्याने कोणी काही तरी केले, या विचारातून ज्येष्ठांच्या सल्लाने या ना त्या ठिकाणी दाखविले; पण फारसा फरक पडला नाही. अशातच अनेक दिवस निघून गेले.

दोन महिन्यांपूर्वी अभिजितने अचानक राजेश यांच्यावर हल्ला केला. हल्ला करताना जिवे मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार सर्वांना धक्का देणारा होता. त्यामुळे राजेश यांनी आपल्याच मुलाची पोलिसांत तक्रार नोंदविली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचे मोठे केले. त्यामुळे या प्रकारानंतरही राजेश यांनी मुलाकडे दुर्लक्ष केले नाही. मुलाला आजारातून बाहेर काढण्यासाठी ते धडपत आहेत. त्यांनी अभिजितला घाटी रुग्णालयातील मानसोपचार आंतररुग्ण विभागात दाखल केले. या ठिकाणी सहायक प्राध्यापक डॉ. संजय घुगे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अभिजितवरील उपचारासाठी परिश्रम घेतले.

गेले वीस दिवस अभिजितवर झालेल्या उपचाराने त्याचा आक्रमक स्वभावात नियंत्रण आणण्यात डॉक्टरांना यश मिळाले; परंतु पुढील उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे या पित्याची थोडी अडचण आणखी वाढली. औरंगाबादेत शासकीय मनोरुग्णालय नाही. त्यामुळे घाटीतून सुटी घेऊन पुढील उपचारासाठी मुंबई अथवा पुणे येथील मनोरुग्णालय गाठवे लागणार आहे. तरीही खचून न जाता ते प्रयत्न करीत आहेत.

दररोजचा आहार देणे अवघडया मानसिक आजारात चिडचिडपणा, कोणालाही न ओळखणे, अचानक हल्ला करणे अशी वर्तणूक होते. शिवाय अभिजितला खूप भूक लागते. भूक लागल्यावर तो अधिक चिडचिड करतो. यावर नियंत्रण येण्यासाठी केसर, बदाम, अक्रोड, चणे, फुटाणे, तूप असा आहार आहारतज्ज्ञांनी दिला आहे; परंतु आर्थिक परिस्थितीने हा आहार देणे या पित्याला जड जात आहे. के. के. ग्रुपने यासाठी मदतीला हात दिला.

वागणुकीवर नियंत्रणअशाप्रकारचे मानसिक आजार सध्या लहान मुलांमध्ये फार दिसत आहेत. अशा मुलांवर औषधोपचारांसोबत पालकांना पालकत्वासंदर्भात योग्य मार्गदर्शन केले जाते. सदर मुलावरील उपचार तसे अवघड होते. तरीही सर्व परिस्थितीचा विचार करून त्याच्या वागणुकीवर नियंत्रण आणले. आहारतज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. त्याच्यावर पुढील उपचार हायर सेंटरमध्ये होतील.- डॉ. संजय घुगे, सहायक प्राध्यापक, मानसोपचार विभाग, घाटी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्य