शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

परभणी मनसे शहराध्यक्ष खंडणीप्रकरणी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:16 IST

औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीमधील खाद्यपदार्थ जास्त दराने विक्री करतात, त्याचे बिलही दिले जात नाही, अशी विविध कारणे सांगून ...

ठळक मुद्दे१ ते २ लाख रुपयांची मागणी : लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद : तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीमधील खाद्यपदार्थ जास्त दराने विक्री करतात, त्याचे बिलही दिले जात नाही, अशी विविध कारणे सांगून पॅन्ट्रीकार व्यवस्थापकास मोबाईलवरून १ ते २ लाखांची खंडणी मागणाऱ्या परभणी मनसे शहराध्यक्षाला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (रेल्वे) एस. एस. दहातोेंडे यांनी त्याला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सचिन पाटील (३२, रा.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पॅन्ट्रीकार सुपरवायझर अशोक चतुर राठोड (रा. गोपालनगर, सांगवी, जि. नांदेड) यांनी तक्रार नोंदविली आहे. लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकारमधील खाद्यपदार्थ अधिक दराने विक्री होते, त्याचे बिलदेखील दिले जात नाही, अशी कारणे सांगत पॅन्ट्रीकारचा परवाना रद्द करू, आंदोलन करूअशी धमकी सदर आरोपीने दि. ३० आॅक्टोबर २०१८ रोजी दिली होती. ३१ आॅक्टोबर रोजी रात्री अशोक राठोड यांना सचिन पाटील आणि उत्तम चव्हाण (रा. संत गाडगेबाबानगर, परभणी) या दोघांनी फोन करून तपोवन एक्स्प्रेसमधील पॅन्ट्रीकार सुरू ठेवण्यासाठी १ ते २ लाख रुपये खंडणी मागितली. तक्रारीवरून लोहमार्ग पोलीस ठाण्यात सचिन पाटील व उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एकाला अटक झाली दुसºया आरोपीचा शोध घेतला जात आहे.७ जानेवारीपर्र्यंत कोठडीलोहमार्ग पोलिसांनी आरोपी सचिन पाटील याला गुरुवारी अटक करून रेल्वे न्यायालयात हजर केले असता ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक सरकारी वकील ए. व्ही. घुगे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप साबळे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMNSमनसेArrestअटक