शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पापडाची लगबग सुरू, नवीन डाळी बाजारात; भाव मात्र शंभरीपार !

By प्रशांत तेलवाडकर | Updated: March 14, 2024 11:37 IST

देशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्याला सुरुवात झाली आणि घरोघरी महिलांची पापड करण्याची लगबग सुरू झाली आहे. याच काळात नवीन मूगडाळ, उडीदडाळ, तूरडाळ व मठडाळ बाजारात आल्या आहेत. मात्र, भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका डाळीच्या उत्पादनावर झाला आहे. हरभरा डाळ व मसूर डाळ वगळता सर्व डाळी सध्या शंभरीपार करून गेल्या आहेत.

कोणत्या डाळींचा भाव काय ? (प्रति किलो)प्रकार सध्याचा भाव आधीचा भावतूर डाळ १५०रु. --१६०रु.हरभरा डाळ ७६रु.--७२ रु.मसूर डाळ ९०रु. -- ९०रु.मूग डाळ ११४रु.--- १०८रु.उडीद डाळ १२६रु.-- १२६रु.मठ डाळ १२०रु.-- १२०रु.

आयातीत डाळीचा प्रभावदेशात डाळींच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आयातीत डाळी बाजारात विक्रीला आल्याने भाववाढ थांबली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा व रशिया येथून डाळीची आवक होत आहे. यात मसूर डाळीचा समावेश आहे. हरभरा डाळीनंतर आता आयातीत मसूर डाळही भविष्यात स्वस्त धान्य दुकानावर विक्रीला येऊ शकते.

हरभरा व मसूर डाळीची प्रतीक्षानवीन हरभरा डाळ व मसूर डाळ येत्या आठ दिवसांनी बाजारात दाखल होतील. या डाळींची सध्या प्रतीक्षा आहे.

डाळींची भाववाढ होणार नाही ?डाळींचे भाव स्वस्त होण्याची शक्यता कमीच आहे. कारण, तूर, उडीद, मूग, मठ यांचे उत्पादन कमी झाले आहे. पुढे लोकसभा निवडणुका असल्याने केंद्र सरकार डाळींचे भाव वाढू देणार नाही. आयातीत डाळी आणणे सुरू राहिल्यास भाव स्थिर राहतील.- श्रीकांत खटोड, व्यापारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarketबाजार