औरंगाबाद : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणाºया शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबादचे राष्ट्रीय पंच उदय पंड्या व उमाकांत शिराळे यांची पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उदय पंड्या हे औरंगाबाद जिल्ह्याचे माजी राष्ट्रीय खेळाडू असून, ते स.भु. विज्ञान महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर उमाकांत शिराळे यांनी आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या दोघांच्या निवडीबद्दल जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, उपाध्यक्ष डॉ. दीपक मसलेकर, रमेश भंडारी, सचिव गोविंद शर्मा, गंगाधर मोदाळे, युसूफ पठाण, संजय मुंढे, रवींद्र दरंदले, गणेश बनकर, डी.डी. लांडगे, ज्ञानदेव मुळे, दीपक सपकाळ, कैलास पटणे, जयेश शिंदे, विकास सूर्यवंशी, श्रीपाद लोहकरे आदींनी अभिनंदन केले.
पंड्या, शिराळे यांची पंच म्हणून निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:18 IST