परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शुक्रवारी मंत्री, आमदार, खासदारांसह राज्यभरातील नेतेमंडळींनी परळीत गर्दी केली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना धीर देत अनेकांनी त्यांचे सांत्वन केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राकाँ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. जयंत पाटील, आ.राजेश टोपे, माजी मंत्री सुरेश धस, पंडितराव दौंड, बदामराव पंडित, प्रा. सुरेश नवले, आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, आ. जयवंत जाधव, आ. अनिल भोसले, आ. रामराव वडकुते, आ. निरंजन डावखरे, आ. नरेंद्र पाटील, आ. ख्वाजा बेग, आ. विक्रम काळे, आ. संदीप बाजोरिया, आ. संगीता ठोंबरे, आ. आर. टी. देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील, माजी आ. दीपक साळुंके, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ. पाशा पटेल, अॅड. उषा दराडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरणकुमार गित्ते, माजी खा. गणेश दुधगावकर, प्रा.टी.पी.मुंडे, फुलचंद कराड, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राकाँ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, नंदकिशोर मुंदडा, जि.प. सभापती बजरंग सोनवणे, रमेश आडसकर, बन्सी सिरसट आदींची उपस्थिती होती. गावागावातून त्यांचे चाहते उपस्थित होते. (वार्ताहर)
पंडितअण्णा मुंडेंच्या अंत्यविधीला मान्यवरांची गर्दी
By admin | Updated: October 15, 2016 00:28 IST