शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

'पालकमंत्री म्हणजे जहांगिरी नाही'; अंबादास दानवेंचा भूमरेंवर हल्लाबोल, डीपीसी बैठकीत राडा

By विकास राऊत | Updated: August 7, 2023 13:47 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरून राडा

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा क्षेत्रासाठी विकास निधी कमी मिळाल्याचा आरोप कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा झाला. विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यात यावरून जोरदार खडाजंगी झाली. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

विकास निधी वाटपावरून जिल्हा नियोजन समितीची आजची बैठक वादळी ठरली. ठाकरे गटाचे कन्नड विधानसभेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या मतदारसंघासाठी पुरवणी मागणीत कमी निधी मिळाल्याचा आरोप केला. हाच मुद्दा उचलून धरत विरोधीपक्ष नेते आ. दानवे यांनी पालकमंत्री दानवे यांच्यावर टीका केली. पालकमंत्री म्हणजे काय जहांगीर नाही, असे म्हणत दानवे यांनी भुमरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. यावर संतप्त झालेले पालकमंत्री भुमरे यांनी देखील, 'हो आमची जहांगिरी आहे, असे म्हणत प्रत्युत्तर दिले. यानंतर चिडलेले दानवे जागेवरून उभे राहिले. हातवारे करत त्यांनी भुमरे यांच्यावर आणखी टीका केली. यावेळी भूमरे यांच्या मदतीला मंत्री अब्दुल सत्तार धावून आले. आ. दानवे यांना पालकमंत्री भुमरे आणि मंत्री सत्तार यांनी तिथेच प्रत्युत्तर दिले. तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने बैठकीतील वातावरण बदलून तणावाचे झाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेSandipan Bhumreसंदीपान भुमरेAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद