शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये आहे ज्ञानेश्वराने वेद वदवून घेतलेल्या रेड्याचे मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 19:35 IST

ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले.

ठळक मुद्देत्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे.

- प्रशांत तेलवाडकर

आपण  देव-देवतांचे मंदिर पाहत असतो; पण पैठणमध्ये रेड्याचे मंदिर आहे. एवढेच नव्हे, तर भाविक रेड्याच्या मूर्तीची पूजाही करतात. कारण, हा रेडा काही साधासुधा नाही, संत ज्ञानेश्वराने या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या रेड्याने वेदांचे उच्चारण करण्यास सुरुवात केली. तोच हा रेडा त्या जागी छोटेशे मंदिर उभारण्यात आले आहे. 

पैठण येथील सर्वात प्राचीन नागघाट होय. हा घाट सातवाहनकालापासून अस्तित्वात आहे. याची नागडोह म्हणून महानुभावांच्या साहित्यात नोंद आहे. याच नागघाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदविण्याचा चमत्कार दाखविला, असे सांगितल्या जाते की, संत निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान-मुक्ताबाई  ही भावंडे पैठणच्या अधिकारी मंडळीकडून शुद्धीपत्र घेण्यासाठी गेले होते. तेव्हा एक महाभाग ज्ञानेश्वरांना म्हणाला की, तू जिवाशिवाचे तत्त्वज्ञान सांगतोस मग रेड्याच्या मुखातून वेद म्हणवून दाखव. तेथून एक रेडा चालला होता. ज्ञानेश्वराने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेदांचे उच्चारण रेड्याच्या मुखातून होऊ लागले. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे वय अवघे १२ वर्षांचे होते.

शके १२०९  इ.स.१२८७ च्या शुद्ध वसंत पंचमीला (शुक्रवारी) ही घटना घडली होती. ज्या ठिकाणी रेड्याने वेद म्हटले त्या  नागघाटावरील त्या जागेवर छोटे मंदिर आहे. भिंतीवर छायाचित्र काढून तो प्रसंग दाखविण्यात आला आहे. खाली त्याची माहितीही देण्यात आली आहे. या घटनेला ७२५ वर्षे पूर्ण झाले तेव्हा नागघाट भक्त मंडळाने येथील दगडी रेड्याच्या मूर्तीचा महाभिषेकही केला होता. या घाटावर सिद्ध वरुण गणपतीचे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाची पुनर्रचना केली, असे म्हणतात. शिवाय शके १७५६ मध्ये रघुनाथ नावाच्या मराठी सरदाराने या घाटास जोडूनच दुसरा घाट बांधला. नंतरच्या काळात  पैठण येथे अनेक घाट बांधण्यात आले.  पैठण येथे जाणारे भाविक नागघाटावर आवर्जून जातात व येथील सिद्धवरून गणपती मंदिराचे प्रथम दर्शन घेतात व नंतर रेड्याच्या मंदिरात जाऊन तिथेही दर्शन घेतात. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी पैठण येथील नगर परिषदेवर आहेच शिवाय पैठणकरासह सर्व भाविकांचेही कर्तव्य आहे.  

टॅग्स :cultureसांस्कृतिकAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन