शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पैठण शहराला पुन्हा गुढ आवाजाचा दणका; आठ वर्षात ३३ वेळा गुढ आवाजाचे हादरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 18:29 IST

शहरात मंगळवारी दुपारी १.४७ वा. जोरदार गुढ आवाजाने पैठण शहर हादरले आवाजाच्या तीव्रतेने नागरिकामधे थोडावेळ चलबिचल झाली.

पैठण: मंगळवारी दुपारी पुन्हा एकदा शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण शहर व परीसराला दणका दिला. गेल्या आठ वर्षात पैठण परिसराला अशा गुढ आवाजाचे ३३ वेळा हादरे बसले आहेत. विशेष म्हणजे, भूकंप मापन यंत्रावर कसलीही नोंद न होणाऱ्या गुढ आवाजाचा शोध घेणाऱ्या भारतीय भूगर्भ वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी देखील या आवाजा समोर हात टेकले आहेत. यामुळे हा आवाज कशाचा या प्रश्नाचे उत्तर अद्याप न मिळाल्याने आवाजाचे गुढ वाढले आहे.

शहरात मंगळवारी दुपारी १.४७ वा. जोरदार गुढ आवाजाने पैठण शहर हादरले आवाजाच्या तीव्रतेने नागरिकामधे थोडावेळ चलबिचल झाली. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने  अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकीच्या काचा कंप पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली. या प्रकाराने नागरिकांची भितीने गाळण उडाली. आठ वर्षात ३३ गुढ आवाजाचे दणके गेल्या ८ वर्षात आज ही तेहतीस वेळा गुढ आवाज होता. दरम्यान, गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिण्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत.

पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे (१०२टी एम सी) क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे.  वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र  मौन बाळगून आहे प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे. शास्त्रज्ञांना सुध्दा गुढ आवाजाचे रहस्य उलगडले नाही. पैठण शहर व तालुक्यात सातत्याने  भुगर्भात होत असलेल्या गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी नागपूर येथील भारतीय भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे पथक  पैठण येथे दि १२ ऑगस्ट २०१५ रोजी दाखल झाले होते. वरिष्ठ भुगर्भशास्त्रज्ञ महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  या पथकाने गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी माती खडक आदीचे नमुने नेले होते. तथापी पैठण शहर व परिसरात सातत्याने होणाऱ्या गूढ आवाजाचे रहस्य शोधताना  जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडिया, नागपूर चे भूगर्भशास्त्रज्ञ ठोस निष्कर्ष काढू शकले नाहीत. परंतू या शास्त्रज्ञांनी पैठण व नागपूर येथील भूकंप मापन यंत्राच्या नोंदीचा हवाला देत या आवाजाचा व भुगर्भीय हालचालीचा काही एक संबंध नसल्याचे ठामपणे जायकवाडी प्रशासनास दिलेल्या अहवालात मांडले आहे. विशेष म्हणजे, या अहवालात आवाजाच्या घटना घडल्या आहेत हे शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले असल्याने शेवटी हा आवाज नेमका येतो कोठून या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरितच राहिले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण