लोकमत न्यूज नेटवर्कपालम : शहरातील बसस्थानक परिसरात तीन ठिकाणी अवैधरीत्या जुगार खेळणाºयांवर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ३० जुलै रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली आहे. २६ आरोपींना अटक करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पालम शहरात काही जण अवैधरीत्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या पथकाने अचानक तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाड टाकून २६ जणांना जुगार खेळताना पकडले आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उपनिरीक्षक अनिल सनगले, पोलीस कर्मचारी नरेश सिरस्कर, टेंगसे, गंगाधर पोथे, विठल गोरे, दिनेश स्वामी, नंदू टेकाळे, श्रीकांत लांडगे, जगन्नाथ भोसले, शेख मुस्तफा आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
पालममध्ये सव्वीस जुगाºयांना केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:18 IST