शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

मालमत्ता करात सूट देणाऱ्या मनपाच्या 'अभय योजने'ची नागरिकांना माहितीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 19:47 IST

पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेनेही मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी दंड आणि व्याजावर ७५ टक्के सूट देण्यात येत आहे.

ठळक मुद्देव्याजाची ७५ टक्के रक्कम माफ करून अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत २५२ कोटी रुपये येतील, असा अंदाज होता.

औरंगाबाद : पुण्याच्या धर्तीवर औरंगाबाद महापालिकेनेही मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी दंड आणि व्याजावर ७५ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा फायदा नागरिक उचलत असून, एप्रिल महिन्यात तब्बल ११ कोटींचा महसूल मनपाला प्राप्त झाला. यात वर्षाच्या प्रारंभीच कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांचाही काही प्रमाणात समावेश आहे. अभय योजनेची मनपाने ज्या पद्धतीने जनजागृती करायला हवी तशी केलेली नाही.

शहरातील सव्वालाखाहून अधिक मालमत्ताधारकांना महापालिकेने वेळेवर कर न भरल्याने शास्ती आणि विलंब शुल्क लावला आहे. त्यामुळे थकबाकीचा आकडा बराच वाढला आहे. व्याजाची ७५ टक्के रक्कम माफ करून अभय योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीत २५२ कोटी रुपये येतील, असा अंदाज होता. मात्र, आता ही शक्यातही धूसर झाली आहे. योजनेच्या पहिल्याच महिन्यात ११ कोटींचा महसूल प्राप्त झाला. मे अखेरीस योजना बंद होईल. या महिन्यात आणखी १० कोटी रुपये येण्याची शक्यता आहे. मनपाने योजनेसाठी ज्या पद्धतीने जनजागृती करायला हवी ती अजिबात केलेली नाही. त्यामुळे असंख्य मालमत्ताधारकांना ७५ टक्के माफीची योजनाच माहीत नाही. कर मूल्य निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी सांगितले की, वॉर्ड कार्यालयांमार्फत जनजागृती सुरू आहे. याला आणखी व्यापक स्वरूप देण्यात येईल. हॅण्ड बिल, रिक्षे लावून जनजागृती करण्यात येणार आहे.

मालमत्ता कराची वस्तुस्थिती२०१७-१८ या आर्थिक वर्षात ९० कोटी मूळ मागणीवर विलंब शुल्क २५ कोटी आणि शास्ती ९५ कोटी ४६ लाख रुपये आकारणी केली. त्यामुळे थकबाकीचा आकडा २२२ कोटी १६ लाखांवर पोहोचला. थकबाकीवर चक्रवाढ व्याज लावण्यात येते. व्याजाची टक्केवारीही २४ आहे. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा व्याजच कितीतर पट जास्त होते. व्याजाच्या धास्तीने नागरिक वेळेवर कर भरतील म्हणून शासनाने ही शक्कल लढविली होती. व्याज पाहून नागरिक कर भरण्यास कंटाळा करीत आहेत.

अशी आहे थकबाकी२२२ कोटी- ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी१२० कोटी- विलंब शुल्क व शास्ती३४२ कोटी- एकूण थकबाकी९० कोटी- ७५ टक्क्यांप्रमाणे होणारे नुकसान२५२ कोटी- महापालिकेच्या तिजोरीत येतील 

टॅग्स :TaxकरAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMONEYपैसा