लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील पेठबीड व शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या टोळीला वारंवार अटक करण्यात आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या, परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने चार जणांच्या टोळीला जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. दोन दिवसांत दोन कारवाया केल्याने खळबळ उडाली आहे.गणेश नरेश जाधव (३१ आयोध्यानगर, बीड), बाजीराम रामचंद्र गायकवाड (२२), सचिन उर्फ खली श्रावण सुरवसे (२२), रविंद्र उर्फ भैय्या तुळशीराम सपकाळ (२२ सर्व रा.पुनमगल्ली, पेठबीड) यांचा या हद्दपार केलेल्या टोळीत समावेश आहे. गणेश हा या टोळीचा म्होरक्या आहे. शिवाजीनगर व पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत यांनी वेगवेगळ्या कारणावरून सर्वसामान्यांना धाक दाखवून जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केले. तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली, परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी या टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.
चार गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 21:48 IST