शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 19:16 IST

डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल.

औरंगाबाद : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी देशभरात ७५ डिजिटल बँका सुरू होत आहेत. त्यात राज्यात नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि सातारा जिल्ह्यांत प्रत्येकी एक अशा चार बँका सुरू होणार आहेत. औरंगाबादेतील बँक गजानन महाराज मंदिर परिसरात असेल. त्यासाठी जागाही निश्चित केल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यस्तरीय बँकर्स कमिटीची बैठक पहिल्यांदाच सोमवारी औरंगाबादेत झाली. बैठकीनंतर कराड यांनी निर्णयांची माहिती दिली. बँकर्स कमिटीची दर तीन महिन्यांनी होणारी ही १५६ वी बैठक होती. बारा सार्वजनिक बँका, खासगी बँकांचे एमडी प्रत्यक्ष तर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी होते. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाबार्डचे सीजीएम जी. एस. रावत, बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक विजयकुमार, आदींची उपस्थिती होती. बैठकीत मुद्रा कर्ज योजनेच्या थकीत कर्जासह विविध योजना, पीककर्ज वाटपासह शासकीय योजनांचा आढावा घेतला गेला.

काय आहे डिजिटल बँक ?डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ग्राहकांना स्वयं-सेवाअंतर्गत, किफायतशीर, कागदरहित, सुरक्षित वातावरणात बँकांची उत्पादने आणि सेवांचा डिजिटल लाभ घेता येईल. व्यवसाय आणि सेवांमधून उद्भवलेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा असेल. शिवाय या बँकांच्या माध्यमातून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज सेवा पुरविल्या जातील. बँकांच्या डिजिटल बँकिंग कक्षांना, बँकिंग आऊटलेट, शाखाच मानले जाईल.

१६२८ गावांमध्ये बँक प्रतिनिधीराज्यात बँक व्यवहार नसणारी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची ३३ गावे असून या गावात डिसेंबर अखेरपर्यंत बँक शाखा सुरू करण्याचा निर्णय बँकर्स समितीच्या बैठकीत झाला. तसेच राज्यातील १६२८ गावांमध्ये बँक नाही, तेथे बँक प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. केंद्रीय वित्त सेवा विभागाने बँक शाखा सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादbankबँक