शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ हजारांपैकी ४९ हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत

By राम शिनगारे | Updated: May 28, 2024 11:59 IST

दहावीच्या निकालातील यश; २७ हजार विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा सोमवारी निकाल जाहीर झाला. या निकालात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९२७ शाळांमधील ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ६२ हजार ८५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची टक्केवारी ९५.५१ टक्के एवढी असून, ६० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४९ हजार २६१ एवढी असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर देशमुख यांनी दिली. त्यात ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेत डिस्टिंक्शनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही २७ हजार ६४४ एवढी आहे.

विभागीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. त्यामध्ये विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा दुसरा आला आहे. बीड जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्याचा सर्वाधिक ९७.७४ टक्के एवढा निकाल लागला. सर्वांत कमी खुलताबाद तालुक्याचा निकाल ९३.९६ टक्के लागला. जिल्ह्याचा निकाल ९५.५१ टक्के लागलेला असतानाच मागील वर्षी हाच निकाल ९३.५८ टक्के होता. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाचा टक्का वाढला.

वेगवेगळ्या प्रकारांतील विद्यार्थ्यांचे प्रस्तावदहावीच्या परीक्षा देतानाच क्रीडासह प्रकार विद्यार्थ्यांना गुण देण्यात येतात. जिल्ह्यातून दिव्यांगांचे २०८ प्रस्ताव विभागीय मंडळाला मिळाले. संपूर्ण विभागांतून ७५१ प्रस्ताव आले. चित्रकलेमध्ये जिल्ह्यातून ४ हजार २१० प्रस्ताव आले. त्यापैकी गुणदानासाठी ४ हजार ३७ प्रस्ताव पात्र ठरले. १७३ अपात्र ठरले. विभागात चित्रकलेचे एकूण १४ हजार ७३० प्रस्ताव दाखल होते. त्यापैकी १४ हजार १३१ प्रस्ताव मंजूर झाले. खेळाडू स्काऊट गाईडचे ८९९ प्रस्ताव आले. त्यापैकी ८५९ प्रस्ताव मंजूर झाले. विभागात एकूण ३ हजार १२ प्रस्ताव आले. त्यापैकी २ हजार ९०१ प्रस्ताव मंजूर झाले.

१४९ गैरप्रकरणांची चौकशीछत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यांत १४९ गैरमार्गप्रकरणी विभागीय मंडळाने चौकशी केली. त्यापैकी परीक्षा सुरू असताना ८७ आणि परीक्षानंतर ६२ गैरप्रकार उघडकीस आले होते. त्या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यात ६१ प्रकरणांत विद्यार्थ्यांच्या विषयाचा निकाल रद्द केला, तर ८८ प्रकरणातील विद्यार्थी निर्दोष सोडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दहावीच्या निकालाची आकडेवारीतालुका..................परीक्षार्थी..........डिस्टिंक्शन........प्रथम श्रेणी........द्वितीय श्रेणी.......उत्तीर्ण........एकुण...........टक्केवारीछ.संभाजीनगर........२७,१५१.............९६८०.............९३४६..............५५५५..............१३०९........२५,८९०..........९५.३५गंगापूर....................८८४४................३४७२.............२८७४..............१५७१..............४३९..........८३५६.............९४.४८कन्नड......................५७१२................२३१०.............१९८१.................९५३................१७५...........५४१९............९५.५७खुलताबाद..............२४०२.................१०३५.............७६७.................३५८................९७..............२२५७............९३.९६पैठण.....................५७८७.................२६१६.............१७६२...............८८४................२०७............५४६९.............९४.५०सिल्लोड..................६५१९.................३९८६.............१८०२................५२३................६१...............६३७२.............९७.७४सोयगाव..................१५८४.................६०३................६११...................२५८................३७..............१५०९.............९५.२६वैजापूर....................४७०२................२१२१............१६११..................६७९................१०५.............४५१६..............९६.०४फुलंब्री.....................३१४६.................१८२१.............८६३..................३३६.................४८..............३०६८...............९७.५२एकूण......................६५,८०५..............२७,६४४.........२१,६१७............११,११७.............२४७८.........६२,८५६...........९५.५१

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSSC Resultदहावीचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्र