शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

नगर,नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त प्रकल्प; मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर कोण टाकतोय दरोडा?

By बापू सोळुंके | Updated: March 27, 2023 20:26 IST

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर : १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणी नसेल तर उर्ध्व भागातील नगर, नाशिकमधील धरणांतून गोदावरी पात्रात पाणी सोडणे बंधनकारक असते. जायकवाडी धरणाच्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या काही वर्षांत बांधण्यात आलेल्या अतिरिक्त लहान, मोठी आणि मध्यम धरणे बांधून सुमारे ३ हजार ३०६.७९ दलघमी अतिरिक्त पाणी साठविण्यात आले आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील जनतेच्या हक्काच्या पाण्यावर एकप्रकारे दरोडाच टाकल्यासारखे असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे गोदावरी नदीवर ४५ वर्षांपूर्वी जायकवाडी धरण बांधण्यात आले होते. या प्रकल्पातून मराठवाड्यातील सुमारे १लाख ८४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते; मात्र आतापर्यंतही संकल्पित सिंचन शक्य झाले नाही. मराठवाड्यातील सिंचन क्षमतावाढीसोबतच मराठवाड्यासह अहमदनगर आणि जालना, बीड जिल्ह्यांतील विविध गावे आणि शहरांची तहान जायकवाडी प्रकल्पामुळे भागविण्यात येते. कोणत्याही धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये नवीन धरणे बांधली तर धरणात पाणी संचय कमी होताे. परिणामी योजनेचा उद्देश सफल होत नाही. असाच काहीसा अनुभव ‘जायकवाडी’च्या बाबतीत येत आहे.

जायकवाडी धरणाच्या उर्ध्व भागात ३४ मोठी आणि मध्यम, १५७ लघुपाटबंधारे आणि कोल्हापूर बंधारे आणि ४०२ (स्थानिक स्तर) लघुपाटबंधारे योजना राबविण्यात आलेल्या आहेत. या योजनांमुळे जायकवाडी प्रकल्पापर्यंत उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील संकल्पित पाणीवापर (४ हजार ५५६.१२ दलघमी) हा संकल्पित उपयुक्त साठ्यापेक्षा (३ हजार ३०६.७९ दलघमी) ३८ टक्क्के जादा आहे. गोदावरी नदीला येऊन मिळणाऱ्या प्रवरा नदीवर अहमदनगर जिल्ह्यात निळवंडे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचा फटकाही जायकवाडी प्रकल्पाला बसला आहे. यासोबत उर्ध्व भागात सात मोठी आणि मध्यम, तर ३१ लघू धरणांचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडीत येणारा पाण्याचा स्त्रोत कमी होईल.

१५ ऑक्टोबर रोजी ६५ टक्के धरण भरण्याची अटसमन्यायी पाणीवाटपानुसार १५ ऑक्टोबर रोजी जायकवाडी ६५ टक्के अथवा त्यापेक्षा कमी पाणीसाठा असल्याचे आढळून आल्यास गोदावरी उर्ध्व खोऱ्यातील धरणातून गोदापात्रात पाणी सोडून हा साठा ६५ टक्के करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असते; मात्र वारंवार मागणी करूनही अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी पाणी सोडण्यास विरोध करतात. अशावेळी जेव्हा राज्यकर्ते ठाम भूमिका घेऊन मरठवाड्यासाठी पाणी सोडण्याचे आदेश देतात तेव्हा पाणी सोडले जाते; मात्र उर्ध्व धरणापासून जायकवाडीपर्यंत पाणी येण्याच्या मार्गात अनेक ठिकाणी कॅनॉलद्वारे पाणी लहान-मोठ्या प्रकल्पांत वळविले जाते. काही वेळा शेतकरी मोटारपंप लावून पाण्याचा वापर शेतीसाठी अथवा शेततळे भरून घेण्यासाठी करतात. तर पाणी सोडण्यास उशीर झाल्यास तापलेल्या वाळूमुळे सोडलेल्या पाण्याच्या ६० टक्केही पाणी जायकवाडीत पोहोचत नाही, असे प्रकार वर्ष २०१२ ते १६ या कालावधीत मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी अनुभवला आहे.

मोठ्या प्रकल्पांना फटका‘जायकवाडी’च्या उर्ध्व गोदावरी खोऱ्यांतर्गत असलेल्या अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात अतिरिक्त लहान-मोठी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले आहे. शिवाय शासनाने आता ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना आणली. यामुळे शेतकरी शेततळे बांधत आहेत. ही योजना राबविताना शेतकरी कालव्याशेजारीच शेततळी खोदतात आणि कॅनॉल, नदीपात्रातील पाणी उपसा करून साठवितात. याचा फटका मोठ्या प्रकल्पांना बसतो. यंत्रणेवर विश्वास न राहिल्यामुळे सध्या वैयक्तिक स्वैराचारासारखे लोक वागत असल्याचे यातून दिसते.- प्रा. प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद