शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फूड पार्क प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली :  हरसिमरत कौर बादल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 14:47 IST

फूड पार्क प्रकल्प युपीए सरकारच्या काळात केवळ प्रस्तावित करण्यात आले, कागदावर असणाऱ्या या प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली आहे.

औरंगाबाद : फूड पार्क प्रकल्प युपीए सरकारच्या काळात केवळ प्रस्तावित करण्यात आले, कागदावर असणाऱ्या या प्रकल्पांना आमच्या सरकारने गती दिली आहे. देशभरातील फूड पार्कमुळे हजारोंना रोजगार मिळाले असून याच्या उभारणीत कर्जासाठी 2000 कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. त्या पैठण येथील मेगा फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. 

अन्न प्रक्रिया उद्योगातील पैठण मेगा फूड पार्कचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते आज दुपारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, आज रोजगाराच्या सर्वात जास्त संधी अन्न प्रक्रिया उद्योगात आहेत. दुध उत्पादनात देश जगात एक क्रमांकावर आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना उपाशी राहावे लागते. याचे कारण म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग नसल्याने हजारो टन अन्न खराब होत आहे. यामुळे फूड पार्क उभारण्याकडे सरकारचे लक्ष आहे. मागील सरकारने फूड पार्क प्रकल्प केवळ कागदावर ठेवली आम्ही त्यांना गती देत देशभरात याची उभारणी करत आहोत असेही त्या म्हणाल्या. 

देशभरात फूड पार्कचे जाळेयुपीए सरकारने 42 फूड पार्क प्रस्तावित केले पण पूर्ण नाही केले नाहीत. आम्ही 2014 ते 2018 पर्यंत 15 पार्क सुरु केले असून 2019 पर्यंत आणखी 15 पार्क सुरु करू अशी माहितीही बादल यांनी दिली. यासोबतच कॉल्डचेनची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी 6000 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. फूड पार्क मध्ये अनेक उद्योगांना संधी आहेत. उद्योगांना कर्ज पुरवठ्यासाठी 2000 कोटीची तरतूद मंत्रालयाने केली असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. तसेच महाराष्ट्र राज्यात येत्या काळात 109 फूड प्रोजेक्ट, 55 कोल्ड स्टोरेज, 3 मेगा फूड पार्क सुरु करणार. अन्न प्रक्रियेसाठी 10000 कोटींची गुंतवणूक  करण्यात आल्याची माहितीही बादल यांनी दिली. 

टॅग्स :foodअन्नAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार