शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध लिंगभेद चाचणी व विल्हेवाटप्रकरणी आणखी काही डॉक्टर रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:29 IST

गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देपथक मागावर: अवैध काम वैध करण्यात आल्याची शंका

औरंगाबाद : गर्भलिंगभेद चाचणी व परस्पर विल्हेवाट लावण्याचा हा गोरखधंदा शहरातील काही दवाखान्यांत सुरू असल्याच्या तक्रारीनंतर शहरातील अजून काही डॉक्टर पथकाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईनंतर ९ जणांना अटक करण्यात आली असून, त्यामुळे अवैध काम करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.डॉ. सूरज सूर्यकांत राणा यांच्या उस्मानपुरा येथे घरवजा दवाखान्यावर टाकलेल्या धाडीनंतर ही साखळी पुढे जोडली जात आहे. डॉ. वर्षा राजपूत आणि दोन डॉक्टरांवर अटकेची कारवाई झाल्यानंतर शहरात काही डॉक्टरांची अवैध गर्भपात प्रकरणात एक साखळीच असल्याचे समोर येत आहे. कोठडीदरम्यान आरोपींकडून समोर येत असलेल्या माहितीवरून आणखी किती डॉक्टर बेकायदा लिंगभेद चाचणी करण्याच्या प्रकारात गुंतले आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे. दरम्यान, अवैध गर्भलिंगभेद प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई केली जात आहे, कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचे मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. नीता पाडळकर तसेच तपासिक अधिकारी व सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी स्पष्ट केले आहे.शहरातील अनेक भागातील माहिती समोर येत असल्याने आणखी कुठे कुठे अवैध गर्भपाताचा धंदा चालवला जातो यावर तपास पथकाने पाळत ठेवली आहे. आरोपींकडून मिळणाºया माहितीवरून मनपाचे पथक आणि पोलीस कारवाईची तयारी करत आहेत.चौकट...काही नावे समोर येत आहेतयासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपींकडून शहरातील काही डॉक्टरांची नावे पुढे येत असून, यादृष्टीने कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपातdocterडॉक्टर