शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिवांची मूळ नियुक्ती चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:08 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार निवारण समितीकडे केली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ : शिक्षणशास्त्र विभागातील प्राध्यापिकेची तक्रार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव तथा विधि विभागाच्या प्रमुख डॉ. साधना पांडे यांची मूळ सहयोगी प्राध्यापकपदाची नियुक्ती चुकीची असल्याची तक्रार विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. शोभना जोशी यांनी तक्रार निवारण समितीकडे केली आहे.विद्यापीठाच्या तक्रार निवारण समिती अध्यक्षाच्या नावाने डॉ. जोशी यांनी तक्रार दिली आहे. यात त्यांनी डॉ. पांडे यांची ३ नोव्हेंबर २००३ रोजी झालेली नियुक्ती चुकीची असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांना देण्यात आले होते. निवेदनावर कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे डॉ. जोशी यांनी विद्यापीठातील तक्रार निवारण समितीकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जासोबत त्यांचे अनुभव प्रमाणपत्र, नियुक्तीचा आदेश आदी जोडण्यात आले आहे. या तक्रारीत म्हटल्यानुसार सहयोगी प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेला अध्यापनाचा अनुभव डॉ. पांडे यांच्या नियुक्तीच्या वेळी नव्हता, तसेच सहायक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेले सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण किंवा पीएच.डी. त्यांनी पूर्ण केलेली नव्हती. त्यामुळे अध्यापनाचा अनुभव नसताना त्यांनी खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून विद्यापीठाची फसवणूक केली असल्याचेही यात म्हटले आहे. नियमबाह्यपणे नेमणूक केलेली असल्यामुळे ती तात्काळ रद्द करण्यात यावी, असेही तक्रारी म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रuniversityविद्यापीठ