शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

संस्था चालकाने घेतला कर्मचाऱ्याला चावा

By admin | Updated: February 4, 2015 00:42 IST

बीड: येथील रुखमाई गोविंंद विद्यालयाचा वाद चिघळला असून संस्था चालकाने कर्मचाऱ्यांविरुद्ध तर कर्मचाऱ्यांनी संस्था चालकाविरुद्ध परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी

बीड: येथील रुखमाई गोविंंद विद्यालयाचा वाद चिघळला असून संस्था चालकाने कर्मचाऱ्यांविरुद्ध तर कर्मचाऱ्यांनी संस्था चालकाविरुद्ध परस्पर विरोधी मारहाणीच्या तक्रारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केल्या आहेत.शहरापासून नजीक असलेल्या रुखमाई गोविंद मतीमंद निवासी विद्यालय, शिवदरा येथे गोपीनाथ यादवराव काळकुटे कार्यरत आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २२ डिसेंबर रोजी वडिलाचे निधन झाल्याने मी गैरहजर होतो. त्यानंतर रजेचा अर्ज दिला. संस्थाचालक व प्रभारी मुख्यध्यापक या दोघांनी अर्ज स्वीकारला नाही व तेव्हापासून ३ फेब्रवारी पर्यंत गैरहजर असल्याचे दाखविले आहे. दरम्यान, संस्थेच्या काही तक्रारींच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. चौकशी अधिकारी यांची भेट घेण्यासाठी काळकुटे व संस्थेचे कर्मचारी गोरख डिसले, शाहू चांदणे, सिद्धेश्वर वाघमोडे, संजय राठोड, बाळू रावतारे मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गेले होते. पंचायत समितीच्या आवारात संस्था चालक शिवाजी चव्हाण यांची भेट झाली. जानेवारीचे पगार व आम्हाला नौकरीवर हजर करुन घेणेबाबत विचारणा केली असता, शिवीगाळ करुन ‘तुम्हाला काय करायचे ते करा, मी तुम्हाला नौकरीवर हजर करुन घेत नाही ’असे म्हणून लाथा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या सोबत असलेले सुरेश धनवट व विठ्ठल मस्के यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शिवाजी चव्हाण यांनी माझा डावा हात धरुन एका बोटाला चावा घेतला. त्यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय नागटिळक करीत आहेत. शिवाजी गोविंद चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एमआयडीसी भागातील व शिवदरा येथील रुखमाई गोविंद मतीमंद निवासी विद्यालय चालवित आहे. संस्थेतील कर्मचारी गोपीनाथ काळकुटे, शाहू चांदणे, अजिम हमीद पठाण, सुभाष निर्मळ, गोरख बिरवे, विजय बनसोडे, मनोहर करांडे, गणेश शिंदे, राजेश्वर पाटील, संजय राठोड, रंजीत खाडे, रणजीत जाधव, राहुल शिंदे, अशोक माळी, रामकिसन गर्कळ, बाळू तोटे हे कर्मचारी अडीच महिन्यांपासून गैरहजर आहेत. त्यामुळे त्यांचे जानेवारी महिन्याचे पगार समाज कल्याण खात्याने दिले नाहीत. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास पंचायत समिती येथे आलो असता वरील सर्वांनी पंचायत समिती येथे मला शिविगाळ केली व ‘तु आमचा पगार का काढला नाही’ म्हणून गोपीनाथ काळकुटे, संजय राठोड या दोघांनी चापटाने व बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय नागटिळक करीत आहेत. (प्रतिनिधी)