शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अवयवदान अभियान लोकचळवळ व्हावी

By admin | Updated: August 28, 2016 00:17 IST

राजेश भिसे , जालना मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करु शकला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत.

राजेश भिसे , जालना मानवाने कितीही प्रगती केली असली तरी तो निसर्गावर मात करु शकला नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत. असे असले तरी देशभरात अवयव निकामी होऊन मृत्यूू झालेल्यांची संख्याही वाढत आहे. जगभरात अवयवदात्यांची संख्या मोठी आहे. ती देशातही वाढावी, यादृष्टिने केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. राज्यातही ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर असे तीन दिवस महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान न राहता ती लोकचळवळ झाली तरच अनेकांचे प्राण वाचू शकतील. डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लिहा यासारख्या अवयवांची मनुष्याला अमूल्य भेट मिळालेली आहे. ही निसर्गाने दिलेली अवयवरुपी भेट मृत्यूनंतर इतर गरजू रुग्णांना दान देता येऊ शकते. या अवयवदानाने मृत्युच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक रुग्णांना जीवदान देऊ शकतो. सद्यस्थितीत देशात सुमारे पाच लाख मूत्रपिंड, पन्नास हजार यकृत, दोन हजारांहून अधिक हृदयविकारांनी ग्रस्त रुग्ण असून, त्यांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुध्दिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुफ्फुस विकारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना असा कोणताही पर्याय नाही. त्यांच्यासाठी हे महाअवयदान अभियान वरदान ठरु शकते. अवयवदानाचे प्रमाण भारतापेक्षा इतर देशांत अधिक असून, त्या देशांची व तेथील जनतेपासून प्रेरणा घेऊन आपणही आता एक पाऊल पुढे टाकण्याची वेळ आली आहे. विचारांच्या जुन्या शृंखला तोडून नव्या विचारांची कास धरली पाहिजे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृती हा अमूलाग्र बदल घडवून आणू शकेल. कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाचे महत्त्व कळल्यास त्यासाठी त्यांची संमती सहज मिळू शकेल आणि तेही त्यासाठी प्रेरित होऊ शकतील. मात्र, त्यासाठी गरज आहे ती जनजागृतीची. महाअवयवदान अभियान यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारनेही कंबर कसली असून, त्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. अगदी राज्य, विभागीय, जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या तयार करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर अभियान राबविले जाणार असले तरी सामाजिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा या अभियानात सहभाग वाढविणे महत्त्वाचे आहे. भारतात मानुष्याचे अवयव निकामी होण्याचे प्रमाण अलिकडे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यास मानवनिर्मित बाबी कारणीभूत असल्या, तरी त्याचे चर्वितचर्वण करीत बसणे उचित ठरणारे नाही. लोकांची मानसिकता बदलून इतर देशांप्रमाणे आपणही आदर्श जीवन पध्दतीचा स्वीकार केला आहे. मग अवयव दानासारखे पवित्र कार्य करण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढे आले पाहिजे. हे राबविताना ‘महा’ विक्रम स्थापित करुन ती लोकचळवळ झाली तरच अभियानाचा उद्देश सफल होईल.