शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाचा आदेश; परीक्षा केंद्राला ठोठावला लाख रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 06:56 IST

उच्च न्यायालयाचा आदेश; जमिनीवर बसून १२ वी परीक्षा देण्याची गंभीर दखल

औरंगाबाद : बीड जिल्ह्यातील रायमोहा गावामधील परीक्षा केंद्रात बेंच उपलब्ध नसल्यामुळे १२ वीच्या विद्यार्थ्यांना जमिनीवर बसून ‘इंग्रजी’ विषयाची परीक्षा द्यावी लागली. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत अतुल कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला तीन आठवड्यांत एक लाख रुपये ‘कॉस्ट’ खंडपीठात जमा करण्याचा आदेश शुक्रवारी दिला. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी हा आदेश दिला. कॉस्ट कमी करण्याची त्यांची विनंती खंडपीठाने नामंजूर करीत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान त्यापेक्षा किती तरी पटींनी जास्त असल्याचे स्पष्ट केले.विद्यार्थ्यांच्या झालेल्या गैरसोयीसाठी परीक्षा केंद्रप्रमुख एस. बी. सय्यद आणि उप केंद्रप्रमुख विष्णू मिसाळ हेसुद्धा जबाबदार असल्याचे निरीक्षण नोंदवीत अ‍ॅड. सत्यजित बोरा यांच्या विनंतीनुसार दोघांना प्रतिवादी करण्याची परवानगी खंडपीठाने दिली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यांत उत्तर दाखल करावे, असे निर्देश देत खंडपीठाने पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे.विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले?कोणतीही व्यक्ती ४० मिनिटे ते एक तासभरच जमिनीवर बसून उत्तरे लिहू शकते. १८ फेब्रुवारीला जमिनीवर बसून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी किती प्रश्न सोडविले होते, याचा खुलासाही खंडपीठाने संबंधितांकडून मागविला आहे. अशा अवघड परिस्थितीत विद्यार्थी नापास झाले, तर त्यात त्यांची काहीही चूक नसल्याचे खंडपीठाने मत व्यक्त केले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाHigh Courtउच्च न्यायालय