शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:26 IST

माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.

ठळक मुद्दे माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याचे प्रकरण

औरंगाबाद : माहिती पुस्तकात खोटी माहिती देऊन ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहक कल्याण निधीत १५ हजार रुपये ३० दिवसांत जमा करण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत.ग्राहकास झालेल्या मानसिक त्रासापोटी ७५०० रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी २५०० रुपये व ३० दिवसांत डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्याचे आदेश मंचाच्या अध्यक्षा स्मीता कुलकर्णी, सदस्य किरण ठोले व संध्या बारलिंगे यांनी दिले आहेत. इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीने ग्राहकास सोलर यंत्रणा बसविण्यासाठी अनुदान व सोलार यंत्रणेतील डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट बसवून देण्यासाठी माहिती पुस्तकात स्पष्ट केले होते.सचिन सुभाषराव जाधव (रा. उत्कर्षनगर, सिडको एन ११) यांनी इन्फोसोल एनर्जी एलपीपी कंपनीची सोलार व्यवस्था घेण्यासाठी सूतगिरणी चौकातील दीपक लड्डा यांच्याकडे माहिती घेतली. कंपनीच्या वतीने ४ के.डब्ल्यू. क्षमतेची सोलार रूफ टॉप आॅन ग्रीड ही यंत्रणा २ लाख ९० हजार रुपयांमध्ये बसविण्याचे निश्चित करण्यात आले. सोलार यंत्रणेत ८१ हजार रुपयांचे अनुदान ग्राहकास देण्याची तरतूद असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. जाधव यांनी ३ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांच्या घरी सोलार यंत्रणा कार्यान्वित केली. त्यासाठी आरटीजीएसद्वारे २ लाख ९० हजार रुपये जमा केले. अर्जदारास अनुदानापोटी कंपनी ८१ हजार परत करील आणि डाटा मॉनिटरिंग इक्विपमेंट कार्यान्वित होईल, असे त्यांना वाटले; परंतु माहिती पुस्तिकेतील उल्लेखाप्रमाणे काहीच मिळत नसल्याने जाधवांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला; परंतु कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली. तेव्हा कंपनीने अनुदानाशी आमचा संबंध नसल्याचे सांगून हात वर केले. तसेच ग्राहकाकडे ब्रॉडबँड, इंटरनेट व वायफाय नसल्याने इक्विपमेंट बसवून देता येत नसल्याचेही सांगितले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सेवेत उणीव ठेवल्याप्रकरणी ग्राहक मंचाने उपरोक्त आदेश दिले. ग्राहकातर्फे अ‍ॅड. राहुल जोशी तर गैरअर्जदार कंपनीच्या वतीने अ‍ॅड. एस. आर. मालानी यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयconsumerग्राहक