शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी १३ क्विंटल तूर खरेदीच्या आदेशानुसार जाधववाडी केंद्रात खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 20:37 IST

: जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांच्या असंतोषामुळे शासनाला बदलावा लागला असून, आता नव्याने हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी आदेश जारी केले आहेत. यंदा पोषक वातावरणामुळे तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे अडत बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यातच जिल्ह्यात हेक्टरी ५.५ क्विंटलच तूर खरेदीची अट शासनाकडून टाकण्यात आल्याने शेतकरी संतापले होते. अखेर, मंगळवारी शासनाने नवीन आदेश काढले. 

शासनाच्या नवीन आदेशाची प्रत, सायंकाळपर्यंत जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाली नव्हती. मात्र, माहिती मिळताच तूर खरेदी केंद्रावर लगेच नवीन आदेशाची अंमलबजावणी करणे सुरू करण्यात आले आहे. यासंदर्भात बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले की, शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी जाधववाडीतील कृउबा समितीच्या परिसरात विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते तूर खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले होते. त्यावेळीस हेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदीचे शासनाचे आदेश होते. उद्घाटन सोहळ्यात तूर उत्पादकांनी मागणी केली की, यंदा तुरीचे उत्पादन वाढले आहे. यामुळे तूर खरेदीची मर्यादा वाढून देण्यात यावी. याचे गांभीर्य ओळखून बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व सचिवांशी चर्चा केली. त्याचे फलित म्हणजे आज नवीन आदेश काढण्यात आले. त्यात हेक्टरी १२ क्विंटल ९७ किलो तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. आदेशाचे पत्र मार्केट फेडरेशनला मिळाले. त्यांच्याकडून आम्हाला फोनवर माहिती मिळताच आम्ही त्याची दुपारनंतर अंमलबजावणी सुरू केली आहे.  सोमवारी तूर खरेदी केंद्रावर याच मुद्दावर शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला होता. फक्त ५.५ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली, तर बाकीच्या तुरीचे आम्ही काय करायचे, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला होता. यास ‘लोकमत’ने वाचा फोेडली होती. नवीन आदेश आल्यामुळे शेतकर्‍यांनी समाधन व्यक्त केले.

दोन दिवसांत ४८ क्विंटल तूर खरेदी जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात दोन दिवसांत ४७ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली. ५,४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दिला जात आहे. शेतकर्‍यांकडून प्रतिहेक्टरी ५.५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ज्यांनी दोन दिवसांत केंद्रावर तूर विक्री केली त्या शेतकर्‍यांकडून नवीन आदेशानुसार  उर्वरित ७ क्विंटल ९२ किलो तूर खरेदी करण्यात येणार आहे. - राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद