शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पोहोचण्यापूर्वीच निघाले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:27 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा ...

ठळक मुद्दे आमदारांच्या एकजुटीचा परिणाम : सकाळी साडेदहा वाजताच निघाले आदेश

औरंगाबाद : जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून पाणी सोडण्यासंदर्भात मंगळवारी सकाळीच आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ गाठले; परंतु ते पोहोचण्यापूर्वीच पाणी सोडण्याचे आदेश काढण्यात आले होते. याठिकाणी पोहोचताच त्यांच्या हातात आदेशाची प्रत देण्यात आली. त्यामुळे आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय कोणालाही घेता आले नाही,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी सोमवारी वज्रमूठ आवळली. यावेळी सरकारने समन्यायी पाणीवाटपाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. जायकवाडीच्या पाण्यासाठी बुधवारी जलसंपदामंत्र्यांची भेट घेण्याचा आणि त्यांच्याकडून न्याय मिळाला नाही, तर मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णयही बैठकीत झाला. दुसरीकडे याच दिवशी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने जायकवाडीत तात्काळ पाणी सोडण्याचे निर्देश दिले.पाणी सोडण्यासंदर्भात सोमवारी झालेल्या चर्चा आणि प्राधिकरणाच्या निर्देशानंतर मंगळवारी सकाळी आमदार प्रशांत बंब आणि संदीपान भुमरे हे महामंडळात पोहोचले. याठिकाणी ते पोहोचल्यानंतर त्यांना थेट काढण्यात आलेल्या आदेशाची प्रत देण्यात आली. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी १०.३० वाजताच आदेश काढले होते. या आदेशाची प्रत या दोन्ही लोकप्रतिनिधींना ११ वाजता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आदेश आपल्यामुळेच निघाले, असे श्रेय घेण्यात येणार होते; परंतु थेट आदेशाची प्रतच हातात पडल्याने हा डाव फसल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.१५० टीएमसी पाण्यासाठी प्रयत्नजायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे तूर्तास रद्द केले आहे; परंतु १५० टीएमसी पाण्याची तूट भरून काढण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाईल. त्यासाठीही सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल. पाणी सोडण्यासंदर्भातील आदेशाची प्रत घेण्यासाठीच महामंडळात गेलो होतो, असे आ. प्रशांत बंब यांनी सांगितले.

टॅग्स :DamधरणMLAआमदार