शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जाचक अटी अन टोलवाटोलवी, राज्यातील १४२९ प्राध्यापकांना पदोन्नती मिळेना

By राम शिनगारे | Updated: July 4, 2024 20:23 IST

१५ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित, उच्च शिक्षण विभागाची टोलवाटोलवी

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील ११ विद्यापीठांतील तब्बल १ हजार ४२९ प्राध्यापकांना मागील १५ वर्षांपासून हक्काच्या पदोन्नतीसह इतर लाभांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्याचवेळी काही प्राध्यापकांना पदोन्नतीसह इतर दिलेल्या लाभाची वसुली करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने दिल्या होत्या. मात्र, त्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्टीकरण दिल्यानंतरही उच्च शिक्षण विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांनी जाचक अटी टाकल्या आहेत. त्यामुळे या प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर होण्याएवजी अधिक खडतर बनला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ दरम्यान नेमणूक झालेल्या एम.फिल.धारक प्राध्यापकांना राष्ट्रीय पात्रता परीक्षेतून (नेट) सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या काळातील प्राध्यापक पदोन्नतीसह इतर लाभांसाठी पात्र ठरले आहेत. त्यानुसार अनेक प्राध्यापकांना पदोन्नतीसह इतर लाभ देण्यात आले. मात्र, बी. एम. शिर्के व इतर विरुद्ध राज्य शासन या मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेचा दाखला देत उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव विजय साबळे यांनी २७ जानेवारी २०२१ रोजी पत्र काढले. त्या पत्रानुसार १४ जून २००६ ते २१ जुलै २००९ या कालावधीतच एम.फिल. पात्रता ग्राह्य धरण्यात आली, तसेच १४ जून २००६ पूर्वी नियुक्ती झालेल्या प्राध्यापकांना पदोन्नतीचे दिलेले लाभ वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यावर एम.फिल. पात्रताधारक संघर्ष समितीने यूजीसीसोबत पत्रव्यवहार केला. 

यूजीसीने ५ सप्टेंबर २०२२ रोजी उच्च शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ च्या दरम्यानच्या एम.फिल.धारकांना नेटमधून सूट देण्यात आल्याचे कळवले. त्यानंतर उपसचिव अजित बाविस्कर यांनी ३० नोव्हेंबर २०२३ रोजी पत्र काढले. त्यात यूजीसीच्या पत्रानुसार पदोन्नती देण्याचे मान्य केले. मात्र, त्यासाठी संबंधित प्राध्यापकाच्या नावाने यूजीसीकडून सूट मिळालेली असावी, अशी जाचक अट टाकली. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघण्याऐवजी पुन्हा क्लिष्ट बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील ११ विद्यापीठांनी एम.फिल.धारक प्राध्यापकांची यादीच यूजीसीकडे पाठविली. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील एम.फिल.ग्रस्त प्राध्यापकांनी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या उपस्थितीत उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नुकतीच राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. गजानन सानप यांच्या नेतृत्वात भेट घेतली.

पदोन्नतीपासून वंचित एम.फिल. पात्रताधारक प्राध्यापकविद्यापीठ.................................................................प्राध्यापकांची संख्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.............३२१सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ......................................१९६शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर...........................................१०९पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ......................२६बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ..........................१२९स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ...........................३७०राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.......................३०संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ....................................१२३मुंबई विद्यापीठ....................................................................७२एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई................................................०३गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली..........................................५०एकूण................................................................................१४२९

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणProfessorप्राध्यापकuniversityविद्यापीठDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद