शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 15:39 IST

राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती मोर्चाचा वापर करू देणार नाही

ठळक मुद्देमराठा क्रांती मोर्चा ही सामाजिक चळवळ 

औरंगाबाद: मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ आहे, या चळवळीत लाखोचा मराठा समाज सहभागी आहे, असे असताना काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले. ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी लढवावी, मात्र राजकीय पक्ष काढण्यासाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या नाव वापरण्यास आमचा विरोध असल्याचे समन्वयक सुरेश वाकडे , किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

किशोर चव्हाण म्हणाले की, मराठा समाजातील कोपर्डी येथील मुलींवर अत्याचार करून खून झाल्याची घटना घडल्यांनतर पहिला मूक मोर्चा औरंगाबादेत ९ ऑगस्ट २०१६ रोजी निघाला. पीडितेला न्याय द्यावा, या मागणीसह मराठा आरक्षण आणि शेतीमालाला हमी भाव आदी मागण्या या मोर्चाने लावून धरल्या होत्या. यापैकी अनेक मागण्या मार्गी लागल्या आहे. राज्यभर ५८ मूकमोर्च निघाले होते. मोर्च्यामुळे सरकारला मराठा समाजाची ताकद आणि शिस्तीचे दर्शन झाले. 

मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ असून मराठा समाजातील सर्व सामान्यांची अस्मिता आहे. मराठा क्रांती मोर्चामध्ये सर्वस्तरातील लोकांनी निस्वार्थ भावनेने एकत्र येऊन उभी केलेली चळवळ आहे. या चळवळीचा वापर काही जण राजकीय स्वार्थासाठी करीत आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चा निवडणूक लढविणार असल्याचे काही लोकांनी मुंबईत जाहिर केले. राजकीय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नावाचा वापर करण्यास आमचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला रमेश गायकवाड, मनोज गायके, सतीश वेताळ, आत्माराम शिंदे, नितीन कदम, शिवाजी जगताप, विक्की पाटील, अमोल सोळुंके आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक