शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला विरोध; सभा उधळून लावण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:21 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत,असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

औरंगाबाद : 'मशिदीवरील भोंगा हटाव' मोहीम हाती घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी शहरात सभा होणार आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापत असून राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशाराही कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. 

जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं की, 'सध्या सर्व जाती-धर्माचे सण-उत्सव शांतता व सद्भावना कायम ठेवून साजरे केले आहेत, अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत, त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत असा आरोप कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंच्या २ मोठ्या घोषणादरम्यान, राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार आहे. तर ५ जून रोजी मनसे सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. भोंगे हटविण्याचा विषय मुस्लीम बांधवांनी धर्मावर नेऊ नये. हा सामाजिक विषय आहे. भोंग्याच्या आवाजामुळे लहान मुले, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. आमच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करणार असाल तर आमचेही हात बांधले नाहीत असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. केवळ हिंदूनाच नव्हे तर मुस्लीमांनाही आवाजाचा त्रास होत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAurangabadऔरंगाबाद