शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

पालकमंत्री संदीपान भुमरेंना दणका; बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:10 IST

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत.

औरंगाबाद :जिल्ह्यातील २१६ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती यायला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये राज्याचे रोहयो तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन आणि आडुळ ग्रामपंचायतीमध्ये विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सरपंच विजयी झाले आहेत.

पैठण विधानसभा मतदारसंघातील आडुळ आणि बिडकीन ही दोन महत्वाची आणि मोठी गावे आहेत. बाजारपेठ असलेल्या या गावाचा कारभार आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे भुमरेंना हा मोठा धक्काच  म्हणावा लागेल.

बिडकीन येथे प्रचार संपल्यानंतर भुमरे यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भुमरे यांच्यावर झाला होता. यावर मी ग्रामपंचायतीच्या प्रचाराला जात नाही, असे म्हणत भुमरेंनी आरोप फेटाळले होते. याच तालुक्यातील बिडकीनच्या सरपचंपदाच्या निवडणुकीत भुमरेंच्या गटाला पराभव पत्करावा लागला आहे.

आडूळ ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनलचे १० तर शिवशाही ग्रामविकास पॅनलचे ५ उमेदवार विजयी झाले आहेत. आज निकाल जाहीर होताच आडूळ गावात फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मातबरांना पराभूत व्हावे लागले. जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाची माळ कोणत्या उमेदवारांच्या गळ्यात पडते याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून होते. बबन भावले २३६४ मते घेऊन विजयी झाले. तर कासाबाई कोल्हे यांना २००२ मते मिळाली. महाविकास आघाडी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख हाजी मुक्तार मौलाना, पोलीस पाटील भाऊसाहेब पिवळ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली.

प्रभाग क्र १- अहिल्याबाई भावले,शिलाबाई पिवळ,राहुल बनकर,प्रभाग क्र २ - भाऊसाहेब पिवळ,मोसीन शेख,द्वारकाबाई पिवळप्रभाग क्र ३-  शेख जाहेर,सोफिया पठाण, हसीनाबी शेख,प्रभाग क्र ४- शेख अजीम,अलका बनकर,शेख नाजमीनबी, प्रभाग क्र ५ - हिरालाल राठोड,कौसाबाई राठोड,विलास चव्हाण

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना