शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

कत्तलखान्याला विरोध कायमच

By admin | Updated: June 2, 2014 01:04 IST

नांदेड : कत्तलखान्याला विरोध ही शिवसेनेची भूमिका असून यात आ़ओमप्रकाश पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत केला़

नांदेड : शहरात उभारण्यात येणार्‍या कत्तलखान्याला विरोध ही शिवसेनेची भूमिका असून या कत्तलखान्यात आ़ओमप्रकाश पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी पत्रपरिषदेत केला़ तसेच विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यामुळे बिथरलेल्या पोकर्णा यांनी माझ्यावर दहा कोटी रुपयांचा खटला दाखल केल्याचे ते म्हणाले़ आ़ओमप्रकाश पोकर्णा यांनी हेमंत पाटील यांच्यावर नुकतेच दहा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे़ त्यानंतर पाटील यांनी रविवारी पत्रपरिषद घेवून आ़पोकर्णा व त्यांच्या पुत्रावर टिका केली़ ते म्हणाले, सध्या अस्तित्वात असलेल्या कत्तलखान्यातील रक्ताचे पाट हे गोदावरीत मिसळत आहेत़ तर दुसरीकडे कत्तलखान्यामुळे गोमातेची कत्तल होणार आहे़ त्यामुळे या कत्तलखान्याला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध आहे़ या कत्तलखान्यात आ़पोकर्णा यांचे पुत्र प्रविण पोकर्णा यांची भागिदारी असल्याचे अनेक पुरावे त्यांनी दिले़ तसेच खुद्द पोकर्णा यांनीच ही मालमत्ता विकत घेतली असल्याचे न्यायालयासमोर सादर केल्याचे पाटील म्हणाले़ कत्तलखान्याच्या विरोधात पशू हत्या विरोधी नागरी समितीने काढलेल्या मोर्चाला नऊ महिने लोटले आहेत़ त्यात या संबधात चौकशीसाठी नेमलेल्या त्रिसदस्यीस समितीनेही दिलेला अहवालही कत्तलखान्याच्या विरोधात आहे़ असे असताना आता माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणे हास्यास्पद आहे़ जमिनीचे व्यवहार करताना ४२ लाखांची मुद्रांक माफी मिळावी म्हणूनही बराच घोळ घालण्यात आला़ त्यांच्या कुटुंबातील सदस्यही राशन धान्य माफीया, गुटखा माफीया, जमीन माफीया असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे़ तसेच न्यायालयाचा आपण आदर करीत असून आता माझ्या नावावर असलेल्या मालमत्तेतून दहा लाख रुपयेही मिळणार नाहीत़ तरी पण पोकर्णा जर निर्दोष असतील तर राजकारणातून सन्यास घेवून रेल्वेस्टेशनवर बुट पॉलीश करुन त्यांनी दाखल केलेल्या दाव्याची रक्कम भरु असेही पाटील यांनी स्पष्ट केले़ यावेळी विरोधी पक्ष नेता दीपकसिंह रावत, प्रविण जेठेवाड, पप्पू जाधव, तुलजेश यादव, बंडू खेडकर, उमेश मुंडे, अशोक उमरेकर यांची उपस्थिती होती़