शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपात नवीन चेहऱ्यांना संधी

By admin | Updated: July 15, 2017 00:25 IST

नांदेड: युवक काँग्रेसचे काम कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात महापालिका व पुढील निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: युवक काँग्रेसचे काम कौतुकास्पद असून येणाऱ्या काळात महापालिका व पुढील निवडणुकांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, परंतु त्यासाठी त्यांचे कार्य आणि जनसंपर्क महत्त्वाचा आहे़ उमेदवारी कुणाला मिळेल यापेक्षा आपण काँग्रेससाठी काम करणार ही भावना ठेवून कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़ दिवंगत डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी आ़ वसंतराव चव्हाण तर आ़ अमरनाथ राजूरकर, आ़डी़पी़ सावंत, माजी आ़हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हा प्रभारी सिद्धार्थ हत्तीअंबिरे, माजी आ़ रोहिदास चव्हाण, संजय लहानकर, किशोर स्वामी, सभापती शीला निखाते, विलास धबाले, विनय पाटील गिरडे, श्याम दरक, संयोजक तथा युवकचे जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, रवींद्र पाटील चव्हाण, आनंद चव्हाण, बालाजी सूर्यवंशी तळणीकर, बाबूराव कोंढेकर, व्यंकटेश जिंदम, संतोष मुळे आदींची उपस्थिती होती़ खा. चव्हाण म्हणाले, शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मागील नऊ वर्षांपासून रक्तदान शिबीर घेण्यात येते़ युवक काँग्रेस राबवीत असलेला हा सामाजिक उपक्रम स्वागतार्ह असून त्यामुळे हजारो जणांना जीवनदान मिळते़ युवकांनी अशाच प्रकारचे कार्य करून जनतेचा विश्वास संपादन केला पाहिजे़ येणाऱ्या निवडणुकांमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल़ सध्याचे भाजपा सरकार अपयशी ठरले असून त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याची टीका खा़चव्हाण यांनी केली़ दरम्यान, आ़अमरनाथ राजूरकर, माजी आ. रोहिदास चव्हाण, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविकात पप्पू पाटील कोंढेकर यांनी युवक काँग्रेसच्या कार्याचा आढावा घेतला़ तसेच आगामी महापालिकेत युवकच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी केली़ यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पावडे, अब्दुल गफार, माधव कदम, जनार्दन बिरादार, रूपेश यादव, रहीम खान, भालचंद्र पवळे, किशन कल्याणकर, बालाजी जाधव, शिवहरी गाढे, प्रशांत चालिकवार, उमेश सरोदे, गोपी मुदिराज, महेश मगर, हरीश हंबर्डे, विशाल राऊतखेडकर, श्याम आढाव आदींनी परिश्रम घेले़ सूत्रसंचालन प्रा़ संतोष देवराये यांनी केले़