चिंचोली लिंबाजी : तुम्ही देवाच्या कार्यात उभे राहिला तर देव तुमच्या सदैव पाठीशी उभा राहील. देवस्थानसारख्या ठिकाणी अन्नदान, श्रमदान व ज्ञानदानाचे कार्य केले जाते. त्यामुळे प्रत्येकाने मंदिर उभारणीसाठी मदत करावी, असे आवाहन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी श्री शनेश्वर देवस्थान कलश बांधकाम भूमिपूजनप्रसंगी केले. नेवपूर-वाकी येथील शनेश्वर देवस्थान कलश बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यात भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उपस्थित संत-महंत व मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन करून बांधकाम कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. २१ जोडप्यांच्या हस्ते कलश पूजन झाले. यावेळी व्यासपीठावर शनेश्वर देवस्थानचे महामंडलेश्वर शनिभक्त सुखदेव महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य दयानंद महाराज (शेलगाव), शिवेश्वर देवस्थानचे ह.भ.प. नामदेव महाराज पल्हाळ, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, माजी आमदार तेजस्विनी जाधव, गट नेते संतोष कोल्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवचित वळवले, भगवान कोल्हे, सुरेश गुजराने, यतीन कदम, सभापती राधाकृष्ण पठाडे, श्रीराम जंजाळ, विठ्ठल जंजाळ, राजू भिसे आदी उपस्थित हाेते.
---- कप्शन : कलश भूमिपूजनाच्या कार्यकमास उपस्थित भाविक.