लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी हा पुरस्कार १७ सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. जिल्ह्यातून ११ जणांची या पुरस्कारासाठी निवड केली जाते. यावर्षी केवळ सहा जणांचेच प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया व समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवा देणाºया शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने दरवर्षी गौरविले जाते. सदर पुरस्काराची जि. प. स्तरावर अंमलबजावणी करून समितीमार्फत विभागीय आयुक्तांकडे या शिक्षकांचा गोपनीय प्रस्ताव पाठविला जातो. सदर प्रक्रीया ५ सप्टेंबरपूर्वी होणे गरजेचे आहे. ज्यामुळे शिक्षकदिनी शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करता येईल. परंतु याबाबत ऐनवेळी नियोजन केले जाते, त्यामुळे शिक्षकांना शिक्षकदिनी पुरस्कार देणे शक्य होत नाही. मागील दोन वर्षांपासून शिक्षकदिनी प्रस्ताव मिळालेच नाहीत. शिवाय यावर्षीही नियोजन केले नसल्याने ४ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन सहा जणांचे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. दरवर्षी ११ जणांना पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. परंतु आयुक्तांकडेच प्रस्ताव पाठविण्यास विलंब होतो. शासन निर्णयानुसार दहा निकष पूर्ण करणारे शिक्षक या पुरस्कारासाठी पात्र असतात. परंतु शिक्षकांच्या उदासीनतेमुळे की काय? यावर्षी मोजक्याच शिक्षकांनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारसाठी प्रस्ताव दाखल केले. १७ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरित करण्याचे नियोजन शिक्षण विभागातर्फे केले जाणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराचे केवळ सहा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:50 IST