शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात रबीची 50.67 टक्केच पेरणी; ज्वारीपेक्षा गहू, हरभऱ्याचा वाढला पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:14 IST

सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे.

ठळक मुद्दे औरंगाबाद, जालना आणि बीड तीन जिल्ह्यांत ८१. ५७ टक्के पेरणी 

औरंगाबाद : कृषी संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रबीची ८१.५७ टक्के पेरणी, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ५०.६७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्याचा पेरा सरासरीपेक्षा वाढला असून,   गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने रबी ज्वारीचा पेरा घटून हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. 

तीन जिल्ह्यांत सरासरी १ लाख ६९ हजार ६६६ पैकी १ लाख ८४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर १०८.७७ टक्के कडधान्याची पेरणी झाली आहे. सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे. बीडमधील तब्बल १३५.९३ टक्के हरभऱ्यासह अन्य कडधान्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी ८१ हजार १५४ हेक्टर क्षेत्र असून, १ लाख १० हजार ३११ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जालना जिल्ह्यात सरासरी ४२ हजार ५६८ हेक्टर असूून, पैकी ४८ हजार ६०७ हेक्टरवर म्हणजे ११४.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४५ हजार ९४४ हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ६३५ हेक्टरवर हरभरा आदी कडधान्याची ५५.८० टक्के पेरणी झाली आहे. थंडी वाढल्याने रबीच्या उर्वरित क्षेत्रावरही गहू आणि हरभरा पेरणी पुढील काही दिवसांत  होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. 

प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारीत तफावतऔरंगाबाद जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत केवळ ५०.६७ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. प्रत्यक्षात पेरणी ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या पाहणीतच विरोधाभासी चित्र दिसून आले आहे. त्यामुळे विभागाला आकडेवारी पुरवणारी यंत्रणा योग्य आकडेवारी पुरवण्यात दिरंगाई करतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  बीड व जालना जिल्ह्यातून आकडेवारी सद्य:स्थितीनुरूप जुळून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद