शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पाच टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Updated: April 1, 2015 01:01 IST

व्यंकटेश वैष्णव, बीड भविष्यात पाणी टंचाई रोद्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत बीड जिल्ह्यात उपयुक्त पाणीसाठा ५.३८ टक्के इतकाच शिल्लक असून

व्यंकटेश वैष्णव, बीडभविष्यात पाणी टंचाई रोद्र रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज स्थितीत बीड जिल्ह्यात उपयुक्त पाणीसाठा ५.३८ टक्के इतकाच शिल्लक असून हेच पाणी जुलैपर्यंत (पावसाळा सुरू होईपर्यंत) पुरवावे लागणार आहे.बीड जिल्ह्यात लघु व मध्यम असे १४१ प्रकल्प आहेत. यामध्ये कृष्णखोरे व गोदावरी खोरे असे दोन भाग पडले आहेत. कृष्णाखोरे अंतर्गत एकूण ८० प्रकल्प आहेत. यातील ४३ प्रकल्पांमध्ये ज्योत्याखाली पाणी आहे. तर २० धरणे कोरडीठाक पडले आहेत. गोदावरी खोरे अंतर्गत ४६ लघु तर ४ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये देखील ‘सील लेव्हल’ च्या खाली पाणी साठा असल्याचा अहवाल जायकवाडी पाठबंधारे विभागाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे बाष्पीभवनमागील दोन ते तीन दिवसात बीड जिल्ह्यात ३९ अंश पर्यंत तापमान गेले आहे. याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या बाष्पीभवनावर होत आहे. माजलगाव येथील मोठया प्रकल्पात आज स्थितीत १०६.१० दलघमी पाणीसाठी आहे. याप्रकल्पातून मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. दिवसाला ५.२० मिलियन मीटर पाणी बाष्पीभवन होत असल्याचे पाठबंधारे विभागातील अधिकारी एफ. एम. शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.अनाधिकृत पाणी उपसा सुरूचबीड जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमध्ये पाणी साठा आहे. त्याठिकाणी अनधिकृतपणे विद्युतपंप बसवलेले आहेत. जिल्हा प्रशासनाने पिण्यसासाठी आरक्षित केलेले लाखो लिटर पाणी दररोज उपसले जाते. याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.बीड जिल्ह्यातील पाणी टंचाई लक्षात घेता मागील तीन महिन्यापूर्वीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बीड जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठी पिण्यासाठी आरक्षीत केलेला आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई असताना देखील बीड जिल्ह्यातील काही प्रकल्पांवर विद्युत पंप बसवून शेतीसाठी पाणी घेतले जाते. याबाबत दोन महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व एसडीओ यांची बैठक घेवून आरक्षीत पाण्यावर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबतच्या कारवाया होत नसल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.