शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या प्रकल्पात फक्त ४.२५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:04 IST

मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.

ठळक मुद्देटँकरचा आकडा दोन हजारांच्या दिशेने : ३० लाख लोकांना टँकरचे पाणी, बंधारे आटले

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न पावसाळ्यापर्यंत असणार आहे.विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३.९० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५ टक्के तर ७४९ लघु प्रकल्पांत ५ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १० टक्के तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विभागीय प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे.कधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून, १८४६ टँकरने आठ जिल्ह्यांतील सुमारे ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाºया आठ दिवसांत २ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ३६८ गावांत, ४८१ वाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे.विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १३ लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ हून अधिक विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ७०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ४०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. सध्या १८०० टँकर खाजगी कंत्राटदार संस्थांचे आहेत. मोठ्या प्रमाणात टँकर लॉबीवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागत आहे. परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टँकरची संख्या कमी असली तरी आगामी काळात ती वाढण्याची शक्यता आहे.मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थितीप्रकल्प संख्या पाणीसाठामोठे ११ ३.९० टक्केमध्यम ७५ ५ टक्केलघु ७४९ ५ टक्केबंधारे १३ १० टक्केइ.बंधारे २४ ००.०० टक्के--------------------------एकूण ८७२ ४.२५ टक्के ------------------

टॅग्स :Marathwadaमराठवाडाwater scarcityपाणी टंचाई