शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

४ हजार ५०० पैकी फक्त २९ रुपये शिल्लक; मुख्यमंत्र्यांनी बहिणीला दिलेले पैसे बँक खात्यातून कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 11:53 IST

योजनेचे पैसे खात्यात जमा होताच बँकेचे चार्ज म्हणून खात्यातून कमी...

- श्रीकांत पोफळेकरमाड : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे आले. मात्र, तत्काळ हे पैसे खात्यातून पैसे कमी करण्यात आल्याने या बँकेतील बहिणींना मुख्यमंत्र्यांच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली. कमी केलेली रक्कम तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ हा थेट खात्यावर जमा होत असल्याने करमाड पंचक्रोशीतील अनेक महिलांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बचत खाते उघडले. काही लाभार्थ्यांचे बचत खाते हे जुनेच आहे, तर काही खाती ही शासनाच्या झिरो बॅलन्स योजनेत देखील उघडलेली आहेत. त्यामुळे या खात्यावर मिनिमम बॅलेन्स मेंटेन करणे हा नियम बंधनकारक नाही. असे असताना देखील अनेक महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे तत्काळ कपात केल्याने अनेक महिला हवालदिल झाल्या.

खात्यातून कमी झालेल्या पैशाची वेगवेगळी कारणे बँकेतून सांगण्यात येत आहेत. अनेकांना बचत खात्यात मिनिमम बॅलन्स मेन्टेन केले नसल्याने त्याची फीस म्हणून हे पैसे कमी केल्याचे सांगण्यात आले, तर काही महिलांना आपण खाते उघडले तेंव्हा अटल पेन्शन योजना आपल्याला देण्यात आली होती. या योजनेचा हप्ता घेण्यासाठी खात्यात पैसे नव्हते, खात्यात जेव्हा पैसे आले तेंव्हा हप्ता म्हणून ही रक्कम कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

४५०० पैकी फक्त २९ रुपये शिल्लक मी खाते उघडले त्यावेळी कुठल्याही पेन्शन योजनेची माहिती मला देण्यात आली नाही किंवा त्या स्वरूपाचा अर्ज मी भरलेला नाही. मात्र, माझ्या खात्यावर आलेले ४५०० पैकी फक्त २९ रुपये माझ्या खात्यावर शिल्लक ठेवले आणि अटल पेन्शन योजनेचे पैसे कमी केल्याचे मला बँकेतून सांगण्यात आले. - आफरीन परवेज शेख, करमाड

काम बुडवून बँकेत आलेमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर आले, ते पैसे काढण्यासाठी मी दोन वेळा काम बुडवून बँकेत आले. मात्र, माझ्या खात्यावर जमा झालेल्या पैशातून बँकेने काही रक्कम कमी केली. कुठल्या कारणासाठी ही रक्कम कमी केली किंवा ही रक्कम परत मिळणार आहे का? याची मला कुठलीही माहिती दिलेली नाही.- सविता बबन कुबेर, गेवराई कुबेर

सर्वांचे पैसे परत करणार...लाभार्थी महिलांच्या खात्यातून कमी झालेल्या पैशाबाबत माझे हेड ऑफिस सोबत बोलणे झालेले आहे. या सर्व महिलांकडून आम्ही लेखी अर्ज घेऊन त्यांचे पैसे पुन्हा त्यांच्या खात्यात वर्ग करू. ज्यांचे ज्यांचे पैसे खात्यातून कमी झाले त्या सर्वांनी बँकेत लेखी अर्ज करावा. - इनामदार, शाखा व्यवस्थापक,महाराष्ट्र ग्रामीण बँक, करमाड.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbankबँकladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा