शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

तंत्रनिकेतनच्या एक लाख २० हजार जागासाठी केवळ १८ हजार नोंदणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:52 IST

तंत्रनिकेतन प्रवेशाला अत्यल्प प्रतिसाद  

ठळक मुद्देएकूण जागेच्या १५ टक्केही नोंदणी नाहीसंचालनालयाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली आहे.

- राम शिनगारे

औरंगाबाद : राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना घरघर लागलेली असतानाच तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) प्रवेशालाही अल्यल्प प्रतिसाद मिळाल्याने येणाऱ्या काही दिवसांत तंत्रनिकेतनही बंद पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात ४३२ तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये १ लाख २० हजारांपेक्षा अधिक जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अवघ्या १८ हजार १७०  विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली. अत्यल्प प्रतिसादामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली आहे.

राज्यात शासकीय आणि खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालयांची संख्या तब्बल ४३२ एवढी आहे. या महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापर्यंत सीईटी सेलकडे होती. मात्र, मागील वर्षी मोठ्या संख्येने जागा रिक्त राहिल्यामुळे यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय  वाघ यांनी विभागाकडे घेतली. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी २२ मे रोजी मुंबईत राज्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुखांची बैठक उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विजय सौरभ, संचालक डॉ. अभय वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी तालुकास्तरावर समुपदेशन करण्याचा निर्णय घेत १०० टक्के प्रवेशाची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकण्यात आली. यासाठी तंत्रशिक्षण मंडळातर्फे १ कोटी रुपये खर्च करून करिअर मार्गदर्शन मेळावे घेणे बंधनकारक करण्याचा निर्णयही एप्रिलमध्ये घेण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अल्प मिळाला आहे. राज्यातील एकूण जागांच्या तुलनेत दहा टक्के विद्यार्थ्यांनीही प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी केलेली नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राज्यातील ४३ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील उपलब्ध २० हजारही जागा यावर्षी भरणार नसल्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांतील जागा रिक्त राहणार असल्यामुळे ३८९ खाजगी तंत्रनिकेतन महाविद्यालये ओस पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

नोंदणी केलेली विद्यार्थी संख्यातंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीला ३ जूनपासून सुरुवात केली होती. १८ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करण्याची मुदत होती. या मुदतीपर्यंत राज्यात एकूण ५४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी अर्ज घेतले. त्यातील ३४ हजार ३४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. त्यापैकी केवळ १८ हजार १७० विद्यार्थ्यांनीच प्रवेशाची कागदपत्रे अपलोड करून तपासून घेत कन्फर्म केले. यामुळे तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेत मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत केवळ १८ हजार १७० विद्यार्थीच होते. उपलब्ध जागांचा आकडा १ लाख २० हजारांपर्यंत आहे. अल्प प्रतिसादामुळे डीटीई विभागाने नोंदणीची मुदत २७ जूनपर्यंत वाढविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयtechnologyतंत्रज्ञान