शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात फक्त १२ रसवंत्यांना परवानगी? १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू

By मुजीब देवणीकर | Updated: April 29, 2023 19:24 IST

शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती.

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होताच शहरात रसवंत्यांच्या घुंगरूचे मंजूळ स्वर कानी पडून लागले. उन्हाळा संपायला आता एक महिनाच शिल्लक आहे. धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण शहरात फक्त १२ रसवंती चालकांनी मनपाकडून परवानगी घेतली आहे. खासगी जागेत रसवंती चालविण्यासाठी मनपाचा बाजार परवाना विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. १०० पेक्षा अधिक रसवंत्या अनधिकृतपणे सुरू आहेत.

शहरात पूर्वी रसवंती चालकांकडून ठराविक रक्कम मालमत्ता विभागाकडून वसूल करण्यात येत होती. अलीकडेच प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी रेडिरेकनर दरानुसार रसवंती चालकांकडून किमान ११ हजार रुपये महिना वसूल करावा, असा निर्णय घेतला. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी मनपाच्या बाजार परवाना विभागाकडे १०० पेक्षा अधिक अर्ज परवानगीसाठी आले. कर्मचाऱ्यांनी रसवंती चालकांना रेडिरेकनर दराची माहिती दिली. हे दर पाहून चालकांनी धूम ठोकली. आता फोन केले तरी रसवंती चालक, मालक मनपात यायला तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात १०० पेक्षा अधिक रसवंत्या राजरोसपणे सुरू आहेत. त्यातील काही खासगी जागेवर आहेत. खासगी जागेवरही रसवंती सुरू करण्यासाठी मनपाकडे दोन हजार रुपये भरावे लागतात.

१० जणांना नोटिसामनपाने अतापर्यंत फक्त १० अनधिकृत रसवंती चालकांना नोटिसा दिल्या. त्यांनी स्वत:हून रसवंती काढून न घेतल्यास अतिक्रमण हटाव विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

सिडको-हडकोत परवानगी नाहीखंडपीठाच्या आदेशामुळे सिडको-हडकोत सार्वजनिक ठिकाणी, खुल्या जागेवर, रस्त्याच्या कडेला, ग्रीनबेल्टमध्ये मनपाकडून परवानगी देण्यात येत असत. यंदा एकही परवानगी दिली जाणार नाही. खासगी जागेवर असेल तरच परवानगी मिळेल.

चिपाटे जाळण्याचे प्रकारआमखास मैदानाजवळील कमल तलाव परिसरात रात्री रसवंती चालक उसाचे चिपाटे आणून टाकतात. त्यावर पेट्रोल, डिझेल टाकून ते पेटवून देतात. त्यामुळे या भागात प्रचंड धूर होतो. परिसरातील हजारो नागरिकांना दोन महिन्यांपासून या धुराचा त्रास सहन करावा लागतोय. वास्तविक पाहता रसवंती चालकांनी शास्त्रोक्त पद्धतीने चिपाट्यांची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर