शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मुखेड तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पाऊस

By admin | Updated: July 23, 2014 00:23 IST

किशोरसिंह चौव्हाण, मुखेड यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

किशोरसिंह चौव्हाण, मुखेडयंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे तालुक्यात १९७२ सारखी दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल, असे चित्र आहे. मागील दीड महिन्यांत तालुक्यात केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत मुखेड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.मागील १५ वर्षांच्या काळात झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सागवान, चंदन, शिंदी, लिंब, बाभूळ आदी झाडांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाल्याने तेवढीच कत्तल तालुक्यात सुरु आहे. तालुक्यात एकमेव लेंडी नदी वाहते. या नदीवर धरण बांधण्याचे काम मागील तीस वर्षांपासून सुरु आहे. धरण अर्धवट अवस्थेत आहे. तालुक्यात कुंद्राळा, तामखेड, चांडोळा आदींसह १० ते १५ लघु तलाव आहेत. या तलावात १५ ते २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तालुक्यात ७६ हजार ८०० हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, ८ हजार सिंचनेक्षत्र आहे. दरवर्षी जून महिन्यात पाऊस झाला की, पेरण्यांची लगबग सुरु होते. यंदा मात्र उलट परिस्थिती आहे. १० जुलै २०१४ रोजी तालुक्यातील मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, जांब, मुखेड या भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली. पुढे पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती, मात्र झाले उलटेच. पाऊसच आला नाही. १० जुलैच्या पावसाने तालुक्यात ३० टक्के पेरणी पूर्ण झाली. २९.९७ हेक्टरवर ज्वारी, ४ हजार २६४ हेक्टरवर सोयाबीन, १ हजार ७६७ हेक्टरवर कापूस, १३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उडीद, १ हजार ३४४ हेक्टरवर मुग, ८ हेक्टरवर बाजरी, १३ हेक्टरवर मका एवढी पेरणी तालुक्यात झाली. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात ८८ हजार ३०७ जनावरांची संख्या असून, ३३ हजार ५१० जनावरे आहेत. ५४ हजार ७९७ मोठी जनावरे आहेत. चार महिन्यांत गतवर्षीपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी जनावरांची संख्या घटल्याचे पशुसंवर्धन विभागाचे म्हणणे आहे. या जनावरांना दरमहा १२ हजार ८७० मेट्रीक टन चारा लागणार आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास डिसेंबर २०१४ पर्यंत २ लाख ५७ हजार ४०० मे. टन चारा लागणार आह तर ३१ मे २०१५ पर्यंत ५ लाख १४ हजार ८०० मेट्रीक टन चारा लागेल. सध्या तालुक्यात २१ जुलैपर्यंत ३४ हजार ४५३ मे.टन चारा शिल्लक आहे. हा चारा ८० दिवस पुरेल. यंदा जनावरांच्या चाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होईल, मागील वर्षी ज्वारीचा पेरा अल्प झाल्याने शेतकऱ्यांकडे ज्वारी शिल्लक राहिली नाही. वाडी-तांड्यावर १५ जुलैपासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. तालुक्यातील ३० गावे, २१ वाडी ताड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.७६ विहीर, बोअर अधिग्रहण करुन वाडी- तांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जाणकार आणि जुन्या पिढीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अशीच स्थिती १९७२ मध्ये निर्माण झाली होती. मागील ११ वर्षांतील पाऊस २००४ मध्ये ९०२ मि.मी, २००५ मध्ये ९०० मि.मी, २००६ मध्ये ८१० मि.मी., २००७-०८ मध्ये ६७९, २००८ मध्ये ६३५, २००९ मध्ये ३८९, २०१० - ८८६, २०११- ७४२, २०१२-५९४, २०१३-१०५१ आणि २० जुलैपर्यंत २०१४ पर्यंत केवळ १०४ मि.मी. पावसाची नोंद तालुक्यात झाली. पेरणीचे दिवस संपले आहेत. आता तर उडीद, मूग, ज्वारी, सोयाबीन, कापूस आदी पिकेही येणे अवघड आहे तर मागील ११ वर्षांत २१ जुलैपर्यंत २००४-२०२ मि.मी, २००५-३०३, २००६-१३२, २००७-१५५, २००८-१२६, २००९-८६, २०१०-२४०, २०११-२४६, २०१२-२८९, २०१३-४८१ पाऊस झाला होता.