शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
5
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
6
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
7
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
8
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
9
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
10
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
11
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
12
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
13
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
14
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
15
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
16
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
17
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
18
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
19
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
20
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून रस्त्यात गाठले, जीवे मारण्याची धमकी; त्रासामुळे तरुणीवर शिक्षण सोडण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:46 IST

टवाळखोरांकडून सतत पाठलाग, रात्री घरासमोर जाऊन घातला धिंगाणा; लग्न केल्यास जीवे मारण्याची धमकी

छत्रपती संभाजीनगर : दोघांची महाविद्यालयातच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, काही वेळांतच तरुणीला मित्राचे वागणे खटकायला लागले. त्याचा खरा चेहरा समोर आल्यानंतर ती त्याच्यापासून दूर गेली. मात्र, ज्याला मित्र मानले, त्याने नंतर एकतर्फी प्रेमातून सतत पाठलाग केला. तिचे घराबाहेर पडणेही अवघड केले. त्यामुळे तरुणीवर अशरक्ष: शिक्षण सोडण्याची वेळ आली. हेमंत संजय काकड (रा. सातारा) असे आरोपीचे नाव असून चिकलठाणा पोलिसांनी त्याला अटक केल्याचे पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी सांगितले.

२१ वर्षीय तरुणी कुटुंबासह चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील शेतकरी आहेत. काही महिन्यांपूर्वी तिची हेमंतसोबत ओळख झाली होती. त्यानंतर ते सतत संपर्कात होते. मात्र, काही दिवसांत तरुणीला त्याचे वागणे, त्रास खटकायला लागला. एकतर्फी प्रेमातून हेमंतने तरुणीवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तरुणीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरू केले. फेब्रुवारी २०२५ मध्ये तिने त्याला स्पष्टपणे सांगून बोलणे बंद केले. तिच्या कुटुंबाने हेमंतच्या कुटुंबाला ही बाब कळवून संपर्क बंद करण्यास सांगितले.

रस्त्यात गाठले, लहान भावाचाही पाठलागहेमंतने मात्र पिच्छा पुरवला. बोलण्याचा हट्ट करत तुझे कोणासोबतही लग्न होऊ देणार नाही, अशा धमक्या दिल्या. लग्न केल्यास पतीलाही मारून टाकण्याचा इशारा दिला. तरुणी तणावाखाली होती. २९ नोव्हेंबरला हेमंतने मित्र प्रकाश रतन जोगदंड याच्या मदतीने तिच्या भावाचा पाठलाग केला. त्यानंतर रात्री १२ वाजता थेट घराच्यासमोर जात धिंगाणा घातला. छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत हेमंतला अटक केली. हेमंतची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी सांगितले. हेमंतवर यापूर्वी सातारा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. पोलिस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे अधिक तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : One-sided love: Harassment forces woman to quit education.

Web Summary : Obsessed stalker harassed a woman, threatening her and her family. The relentless pursuit forced her to abandon her education. Police arrested the accused.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर