शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राणी अहिल्याबाई होळकरांचे एक समाजाभिमुख कार्य म्हणजे सातारा परिसरातील बारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:07 IST

साताऱ्यातील राणी अहिल्याबाईंच्या वारशाचे पुनरुज्जीवन

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले खंडोबा मंदिर हे आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. या मंदिराचा जीर्णाेद्धार आणि पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून खोदण्यात आलेली बारव (पाण्याचा कुंड) हे राणी अहिल्याबाई होळकर यांच्या समाजाभिमुख आणि दूरदृष्टीने केलेल्या कारभाराची साक्ष देतात.

अठराव्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी भारतभर विविध ठिकाणी मंदिरे, घाट, बारवा, विहिरी, धर्मशाळा अशा सार्वजनिक उपयोगाच्या वास्तूंचे निर्माण व पुनर्बांधणी केली होती. साताऱ्यातील खंडोबा मंदिर आणि त्याला लागून असलेली बारव ही त्याच कार्याची जिवंत साक्ष आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या बारवेमुळे त्या काळात पिण्याच्या पाण्याची अडचण दूर झाली होती. बारव अजूनही वापरात असून, स्थानिक प्रशासनाने तिच्या जतनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

इतिहास अभ्यासक डॉ. मोहित देसाई यांनी सांगितले की अहिल्याबाई होळकर यांचा प्रशासकीय कारभार केवळ धार्मिक नव्हे, तर सार्वजनिक विकास आणि पर्यावरणपूरक होता. त्यांनी जिथे मंदिरे उभारली, तिथे पाण्याची सोय केली. प्रवाशांच्या निवासासाठी धर्मशाळा बांधल्या. आजही राणी अहिल्याबाईंच्या कार्याचा ठसा देशभर अनेक स्थळांवर उमटलेला दिसून येतो. त्यांच्या या कारभाराची साक्ष देणारे साताऱ्यातील मंदिर व बारव असून, त्याचे जतन झाले पाहिजे.

मंदिराचे अर्धवट पडलेले काम शासन व पुरातत्व विभागाकडून सुरू झाले आहे. हे काम पारंपरिक वास्तुकलेच्या शैलीत करण्याचा प्रयत्न होत आहे. स्थापत्यातील बारकावे जपण्यासाठी कुशल टीम काम करत आहे. मंदिराचे गतवैभव त्याला प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. अहिल्यादेवींच्या स्मृतींना जतन करण्यासाठी ट्रस्टीदेखील सजग आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व पुरातत्व खात्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या वास्तूंच्या जतनासाठी संयुक्त प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांची आहे. पर्यटनदृष्ट्या या वास्तूचे महत्त्व आहे. या ठिकाणाचा समावेश साताऱ्यातील पर्यटन नकाशात करून त्याचा विकास करणे शक्य आहे.- डॉ. विलास पारखे, धनगर समाजविषयक अभ्यासक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर