शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शंभर कोटीतील रस्त्यांची कामे संथ; २०० कोटी रुपयांवर मनपा फेरणार पाणी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 19:38 IST

७५ कोटी खर्च केल्यास मिळणार होते २०० कोटी

ठळक मुद्देशासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली.सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते.

औरंगाबाद : रस्त्यांसाठी दिलेले शंभर कोटी रुपये लवकर खर्च करा, आणखी २०० कोटी देतो, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले खरे मात्र महापालिकेला शंभर कोटीपैकी ७५ कोटी रुपयेही खर्च करता आलेले नाहीत. त्यामुळे मनपा २०० कोटी रुपयांना मुकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शहरात १०० कोटींतील रस्त्यांची कामे कंत्राटदारांकडून संथगतीने सुरू आहेत, तर महापालिका प्रशासन ही कामे करुन घेण्यात कमी पडत आहे. या बाबीचे पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. नगरसेवकांनी कंत्राटदारांच्या मनमानीचा अक्षरश: पाढाच वाचला. सप्टेंबर अखेरपर्यंत ७५ टक्के काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांना दंड आकारण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये मनपाला शंभर कोटींतील ७५ टक्के रक्कम खर्च करता येणार नाही. त्यामुळे शासनाकडून रस्त्यांसाठी आणखी २०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे. कंत्राटदारांमुळे महापालिकेला २०० कोटी रुपयांवर पाणी फेरावे लागणार हे निश्चित. 

शासनाचे १०० कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत पडून असताना रस्त्यांची कामे का रखडली. प्रशासन कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे. अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी खोदकाम केले आहे तर काही ठिकाणी रस्त्यांची एक बाजू बंद असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. मनपा अधिकारी काम करून घेण्यास असमर्थ ठरले असून, नागरिक नगरसेवकांना जबाबदार धरत आहेत, अशी कैफियत जंजाळ यांनी मांडली. राजू शिंदे यांनी रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. 

सचिन खैरे यांनी जुन्या शहरातील रस्त्यांची कामे कधी सुरू होणार? अशा प्रश्न केला. त्यावर तांत्रिक विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी नमूद केले की, सप्टेंबर अखेरपर्यंत कंत्राटदारांनी ७५ टक्के  कामे करणे गरजेचे होते. महापालिकेने ठरवून दिलेल्या टप्प्यानुसार कामे होत नाहीत, हे खरे आहे.  त्यामुळे दंडात्मक कारवाईच्या नोटिसा  चारही कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत. वेळप्रसंगी त्यांना ब्लॅकलिस्टही केले जाईल, असेही काझी यांनी नमूद केले.

घोडेस्वारी केल्यासारखे वाटते१०० कोटींत आतापर्यंत तयार झालेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचा दावा मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत असला तरी या रस्त्यांवरून वाहनाद्वारे चक्कर मारल्यास घोडेस्वारी केल्याचा अनुभव येतो. ४अनेक ठिकाणी निकृष्ट साहित्य वापरले जात आहे. यावरही काझी यांनी सांगितले की, पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी केली जात आहे. दर्जाबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारfundsनिधी