लातूर : लातूर तालुक्यातील सेलू (शिवणी) येथील घरावरील असलेली झाडाची फांदी तोडताना विजेच्या धक्क्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी घडली. सेलू (शिवणी) येथील महादेव नारायणराव कांबळे (५५) हे आपल्या घरासमोरील फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यांच्या घरापासून विद्यूत खांबावरील विजेची तार गेली आहे. ही उच्चदाब विजप्रवाह तार असल्यामुळे भविष्यात धोका निर्माण होवू नये, यासाठी त्यांनी सोमवारी सकाळी तारेवर लोंबकळणारी झाडाची फांदी तोडण्याचा विचार केला. ही फांदी तोडत असताना, अचानक झाडामध्ये विजप्रवाह उतरला. यावेळी महादेव कांबळे यांना विजेचा धक्का बसला. या धक्क्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लातूर येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली आहे. (प्रतिनिधी)
विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By admin | Updated: April 25, 2016 23:31 IST