शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अपघातानंतर मृतदेहांच्या अंगावरील सोने चोरीप्रकरणी एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:48 IST

मृतांच्या अंगावर असलेले २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील १३ हजार रुपयेही चोरी झाल्याचे नातेवाईकांना दिसून आले.

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर) : अपघातात ठार झालेल्या हैदराबाद येथील मृत भाविकांच्या अंगावरील सोने चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या एक तासातच गंगापूर पोलिसांनी एका जणाला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरी गेलेले सोने हस्तगत करण्यात आले आहे. आकाश गुलाब साळवे (वय २२, रा. सखाराम पंतनगर) असे आरोपीचे नाव आहे.

हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. दर्शन घेऊन ते बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहून गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा येथे त्यांच्या जीपला भीषण अपघात झाला होता. या अपघातात एका लहान मुलासह तीन महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गुरुवारी सकाळी मृतांचे नातेवाईक हे गंगापूर येथे आले असता, त्यांना मृतांच्या अंगावर असलेले २ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. तसेच जखमीच्या खिशातील १३ हजार रुपयेही चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी मनीकंठ रमेश श्यामशेट्टी यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. 

पोलिसांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही व इतर तांत्रिक मदतीने संशयित आकाश साळवे यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख ५० हजार रुपयांचे सोने हस्तगत केले आहे. मात्र लंपास २० हजारांची सोन्याची अंगठी व अपघातातील जखमी श्यामशेट्टीच्या खिशातील चोरलेल्या १३ हजार रुपयांचा अद्यापही तपास लागला नसून चोरीच्या घटनेत आणखीन इतर कोणी सामील आहेत का, याचा पोलिस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर