शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एक आरोपी... तपासासाठी तब्बल सव्वादोनशे पोलीस

By admin | Updated: December 19, 2014 01:02 IST

विनोद काकडे, औरंगाबाद तीन महिन्यांपासून पोलिसांना वाँटेड. शोधासाठी झटतोय पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा तब्बल २१५ जणांचा फौजफाटा,

विनोद काकडे, औरंगाबादनाव : गणेश संजय गायकवाड. धंदा : वीटभट्टी मजूर. गुन्हा : बलात्कार आणि खून, या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून पोलिसांना वाँटेड. शोधासाठी झटतोय पोलीस अधिकारी व कर्मचारी, असा तब्बल २१५ जणांचा फौजफाटा, ८२ वेळा कोम्बिंग आॅपरेशन राबविले... पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड शून्य, त्यामुळे सराईतही नाही. असे असतानाही एक साधा गुन्हेगार सापडत नाही, यावरून औरंगाबाद पोलिसांच्या ‘गुणवत्ते’चा अंदाज येतो!आपल्या शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या आमिनाबीचा मिटमिटा परिसरात बलात्कार करून खून केल्याचा प्रकार २९ आॅगस्ट रोजी उघडकीस आला होता. तपासात हे कृत्य मिटमिटा परिसरातच वीटभट्टीवर काम करणारा आरोपी गणेश गायकवाड (रा. गदाणा, खुलताबाद) याने केल्याचे उघडकीस आले. तसे पुरावे पोलिसांना सापडले. गायकवाडविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात बलात्कार व खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आरोपीच्या अटकेसाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा अंदोलनेही केली. आपल्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये रोष वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर गणेशच्या शोधासाठी पोलीस ठाणे, गुन्हे शाखा अशी मिळून तब्बल दहा विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये ५ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक व २०० पोलीस कर्मचारी असा सव्वादोनशे जणांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकारी स्वत: या तपासावर लक्ष ठेवून होते. इतक्यावरच भागले नाही म्हणून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी ग्रामरक्षक दल, प्रत्येक गावातील चावडी, तंटामुक्त सदस्य, मित्रमंडळे, भिल्ल समाजाचे अध्यक्ष, समाजसेवकांचीही मदत घेतली.