शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई; फुलांच्या किमतीत दुपटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:10 IST

ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या काळातच फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे उन्हाचा तडाखा, तर दुसरीकडे लग्नसराई यामुळे फुलांच्या किमती दुपटीने वाढलेल्या दिसून येत आहेत. बाजारात आधी ७० ते ८० रुपयांना मिळणारा गुलाब आता दीडशे रुपयांवर पोहोचलाय, तर निशिगंध, जिप्सी, जरबेरा, शेवंती या फुलांच्या किमतीही सध्या दुपटीने वाढल्या आहेत.

ऐन लग्नसराई आणि सणासुदीच्या काळातच फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले आहेत. फुलाच्या बागांना जास्त पाणी लागते. सध्या उन्हाची वाढलेली तीव्रता पाहता फुलबागांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे शहरातील मुकुंदवाडी, गुलमंडी, पैठणगेट येथील बाजारात फुलांची आवक कमी झालेली आहे.

मुकुंदवाडीतील बाजारात यापूर्वी ३० रुपयांना मिळणारा झेंडूच्या फुलांचा हार आता ५० रुपयांना विकला जातोय. फूल विक्रेते शकील पठाण म्हणाले, पूर्वी एका दिवसाला ३० ते ४० पर्यंत फुलांचे हार विकले जात होते. सध्या केवळ १५ ते २० हार विकले जात आहेत. तसेच, उन्हामुळे फुले, हार खराब होत आहेत. आम्हाला नुकसान सोसावे लागत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

फुलांचे नाव व सध्याचे दरगुलाब- पूर्वी ७० ते ८० रुपये आता १५० रुपयेनिशिगंध- पूर्वी १५० रुपये आता ३०० रुपयेजिप्सी- पू्र्वी १५० रुपये आता ४०० रुपयेजरबेरा- पूर्वी ४० रुपये आता ८० रुपयेशेवंती- पूर्वी २०० रुपये आता ३५० रुपये

हात आखडता घेतलाउन्हामुळे फुलांच्या विक्रिवर २० ते ३० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. फुलांचे हार जयंत्या, विशेष कार्यक्रम, सणावारांसाठी खरेदी होत आहे. मात्र, दर दुप्पट झाल्यामुळे सामान्य नागरिकांकडून फुलांची खरेदी करताना हात आखडता घेतला जात आहे. कार्यक्रम, लग्नात मागणी कायम आहे.-रतन जाणा

दिल्लीवरून आले हायड्रेंजियाकॅननोट प्लेस येथील एका फुलांच्या दुकानात सध्या हायड्रेंजिया आणि लिलियम ही दुर्मीळ फुले पाहायला मिळत आहेत. ही दोन्ही प्रकारची फुले खास दिल्लीवरून मागवण्यात आली आहेत. शहरातील एका विशेष कार्यक्रमात सजावटीसाठी या फुलांची मागणी करण्यात आली होती. हायड्रेंजिया या एका फुलाच्या गुच्छाची किंमत ही ८०० रुपये आहे, तर जांभळ्या लिलियमची किंमत १२०० आहे.

टॅग्स :FlowerफुलंMarketबाजारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर